मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्य नदी आणि धारण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने जिल्ह्यातील वसई,विरार, नाला सोपारा, स्फले, केलवे, पालघर, बोईसर आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान वसई परिसरात भुसंखलन होऊन चौघांचा मृत्यू झाला.ता तिघे जखमी आहेत. तर नालासोपारा स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे या जिल्ह्यातील तानसा,वैतरणा या मुख्य नाद्यांसह त्यांच्या उपनद्या दुधदी भरून वाहत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत,नागोठणे,पाली,खोपोली,पेन पनवेल, रोहा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी,अंबा, काळं,कुंडलिक या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरले आहे नाशिक मध्येही तुफान पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे परिणामी नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे शहराला पाणीपुरवठा करणारी गंगापूर धरणही ओव्हरफ्लो झाल्याने या धारणा मधील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे .
Similar Posts
ओमीक्रोन ची मुंबईत एंट्री २ रुग्ण सापडले, संपर्कातील ३२० जन संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई/ संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या ओमी क्रोन ने आता मुंबईत सुधा एंट्री केली असून आफ्रिकेतून आलेला एक इसम आणि त्याच्या सोबत राहिलेली पण अमेरिकेतून आलेली त्याची मैत्रीण या दोघांनाही ओमी क्रोन ची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील ५ आणि आणि इतर ३१५ अशा…
अवमान याचिकेवरील सुनावणी सोमवारी एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार
मुंबई/ न्यायालयाच्या आदेशानंतरही एस टी कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे . मात्र त्यावरील सूनवणींबई उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे .दरम्यान काल राज्याच्या वेग वेगळ्या भागातून असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले .त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलिसांनी परवानगी नाकारली ….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसरकार आणि पक्षातही डावललं नाराजी वाढली शिंदे गट फुटणार?
मुंबई/ शिवसेनेत बंडखोरी करून ज्या 40 आमदारांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले होते मात्र त्यातील काहींना सरकार आणि पक्ष संघटनेत सुधा कोणतेही पद मिळालेले नाही त्यामुळे ते नाराज झाले असून त्यातील काही फुटण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहेएकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करून महा विकास आघाडीचे सरकार पाडले…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयही तर धोक्याची घंटी
राज्यसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मते फोडून भाजापने तिसरा उमेदवार निवडून आणला अगदी तशाच प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय खेळी खेळून भाजपने त्यांच्याकडे पुरेशी मते नसतानाही पाचवा उमेदवार निवडून आणला.त्यामुळे महाविलास आघाडीतले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षात समन्वय नाही त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याची क्षमता नाही सते मध्ये असताना जर हे…
बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय जारी मुंबई, दि. ३०: बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय आज गृहनिर्माण विभागाने जाहिर केला…
म्हसवडच्या सिध्देश्वर यात्रेला सशर्त परवानगी
सातारा/कोरोनच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आलेल्या म्हस्वडच्या सिध्देश्वर यात्रेला अखेर प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे
