[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

बाई वाड्यातून जा- धमाल विनोदी नाटक रंगभूमीवर


     अभिनेते दिगंबर नाईक आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील यांचे आगामी बाई वाड्यातून जा हे धमाल विनोदी नाटकाचा शुभारंभ प्रयोग अत्रे रंगमंदिर कल्याण येथे रंगणार आहे .कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे. या नाटकाची कथा एका जुन्या वाड्याभोवती फिरते . हा वाडा विकायचा असतो, तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो याची धमाल कथा या नाटकातून पाहायला मिळणार आहे .या नाटकात भूषण घाडी , दीपा माळकर, भावेश टिटवळकर ,अश्वजीत सावंतफुले, आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

error: Content is protected !!