[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

निट परीक्षेतील गोंधळाची सिबीआय चौकशी करण्याची मागणी


मुंबई : डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून देशभरातून लाखो विद्यार्थी नीट परीक्षा देतात. मात्र त्यात गैरप्रकार होत असतील तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. तसेच परीक्षेच्या निकालात निष्पक्ष मूल्यमापन प्रक्रिया व्हावी यासाठी पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने सरकारकडे केली आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नीट परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. हा फरक लाखात आहे. तसेच ६७ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवणे हे एनटीएच्या गुण पद्धतीमध्ये अशक्य आहे. एनटीएच्या परीक्षेत प्रत्येक प्रश्नामध्ये उणे ४ गुण असतात. ज्यामुळे चुकीच्या उत्तरासाठी एकूण ५ गुणांचे नुकसान होते. पण या वर्षी विद्यार्थ्यांना ७१८ आणि ७१९ गुण मिळाले आहेत, यावरून चाचणी आणि मूल्यमापन संशयास्पद असल्याचे सिद्ध होते. विद्यार्थ्यांना फसवणूक किंवा पेपर फुटणे यासारख्या कोणत्याही फसव्या कृतीत सहभागी होण्यापासून परावृत्त केले. असे आचरण समाजात नकारात्मकता निर्माण करते आणि त्याचा संपूर्ण समाजावर घातक परिणाम होतो. त्यामुळे नीट परीक्षेच्या आकडेवारीतील विसंगतींबद्दल सीबाआय चौकशीची मागणी करत विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती नॅशनल टेस्टिंग एजन्सीसह पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. व्ही. बसवराज यांनी

error: Content is protected !!