दिल्ली/ भाजपने केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,मणिपूर,बिहार आणि मेघालय इथली सरकार पडली आहेत . त्यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च करून 277 आमदार विकत घेतले असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केला आहे .अबकारी धोरण बदलल्यपासून भाजप आणि आम्आदमी पक्षात वाढ सुरू झाले . त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरावर ई डी ने छापे टाकले . त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असून केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून भाजप सरकारचे वाभाडे काढले . ते म्हणाले की मोदी सरकारने आपल्या उद्योग पतीमित्रांचे 3 लाख कोटी माफ केले तसेच एका उद्योगपतींचे 10 कोटी माफ केल्यानंतर त्याने भाजपला मोठ्या रकमेचा चेक दिला असा आरोपही त्यांनी केलाय .
Similar Posts
पोलंड मध्ये भगवान श्रीकृष्ण विरोधाचा दावा न्यायालयाने फेटाळला
मुंबई/ हिंदू धर्म एक पवित्र धर्म असून आज जगभरात हिंदू धर्माच्या समर्थकांची संख्या वाढत आहे अशावेळी हिंदू देव देवता बदनाम करण्याची मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे.पण असे लोक कसे तोंडघशी पडत आहेत त्याच एक जबरदस्त उदाहरण माझी उपमापोर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सांगितले आहे ते म्हणाले पोलंड क्या वोर्सा येथे एका नन…
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातील ७४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य पदक देऊन गौरव
नवी दिल्ली / महाराष्ट्र ही शुर वीरांची भूमी असून तिला शिवछत्रपतींच्या शौर्य शाली इतिहासाचा वारसा आहे आणि लष्कर असो की पोलीसदल आजही या दोन्ही ठिकाणी हा वारसा जपला जातोय.आणि महाराष्ट्रातील अनेक शूरवीर लष्कर आणि पोलीस दलात शौर्य गाजवत आहेत .पोलीस दलातील अशाच ७४ शुर विराना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले यात ४पोलीस अधिकाऱ्यांना…
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत विरोधी पक्ष नेतेही आग्रही
मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात…
शिंदेंच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर
मुंबई/ अनधिकृत बांधकामांच्या कडे नेहमीच कानाडोळा करणाऱ्या मुंबई महापालिकेने यावेळी मात्र इतकी सतर्कता दाखवली की चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवून सरकारलाच मोठा धक्का दिलाशिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर शिंदेंच्या सरदारांनी सुरवातीला शिवसेनेच्या शाखा बळकावण्याचा प्रयत्न केला पण शिवसैनिकांनी त्याला कडवा विरोध करताच शिंदेंच्या सेनेने आपल्या पक्षाच्या शाखा बांधायला सुरुवात केली चेंबूर…
करोना मध्ये मृत पावलेल्या 254 पैकी17 कर्मचाऱ्यांच्या वारसांची कोंडी तिसऱ्या अपत्या मुळे नोकरीचा दावा नामंजूर
मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण…
अंधेरी के -पूर्व विभागाचे विभाजन होणार
मुंबई -नागरिक सुविधा पुरवण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन अंधेरी के पूर्व विभागाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे . के दक्षिण व के उत्तर असे नवीन विभाग तयार करणार होणार आहेत यातील एका प्रभागात सात तर दुसर्या प्रभागात आठ प्रभाग समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे प्रत्येककाला नागरिक सेवा पूर्ण शक्य होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे….
