मुंबई/वरळीतील गोमाता एस आर ए इमारती मधील किशोरी पेडणेकर यांच्या ताब्यात असलेल्या चार सदनिका बाबत एस आर ए चां कलम 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन या सदनिका ताब्यात घ्याव्यात असे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत .एस आर ए चां नियमानुसार झोपू योजने अंतर्गत मुळ लाभार्थ्याला मिळालेले घर 10 वर्ष भाड्याने देता येत नाही या प्रकरणात कलम 3 अ चे उल्लंघन झाल्याचे झोपू प्राधिकरणाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता मूळ भाडेकरू विरोधात निषकासणाची कारवाई करून या सदनिका ताब्यात घेतल्या जाणार आहेत .आणि ही कारवाई मुंबई महापालिकेकडून केली जाणार आहे . वरळीतील झोपू योजनेतील 4 सदनिका किशोरी पेडणेकर यांनी बळकवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता त्यांच्या तक्रारीनंतर झोपू प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी केली तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात सदनिकांची पाहणी केली असता . त्या सदनिका इतरांच्या ताब्यात असल्याचे दिसून आल्यानंतर एस आर ए ने नोटीस बजावून कारवाई केली किशोरी पेडणेकर याना हा मोठा धक्का आहे
Similar Posts
नकली राष्ट्रवादी , नकली शिवसेनेकडून विकास होणार नाही – अमित शहा यांचा उद्धव ठाकरे, शरद पवार व कॉंग्रेसवर हल्लाबोल
नांदेड: महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, पण तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती असल्याची जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. महाराष्ट्राचा विकास हे तीन पक्ष करू शकत नाहीत, हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे मोदींनी…
काँग्रेसचा मनसेला विरोध महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर
मुंबई/मत चोरीच्या मुद्द्यावर भलेही महाविकास आघाडीने मनसे सोबत मोर्चा काढलेला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे.कारण मनसेची परप्रांतीय विरोधी भूमिकेचा काँग्रेसला बिहार निवडणुकीत फटका बसू शकतो म्हणूनच महाराष्ट्र काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला सोबत न घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.तर उद्धव ठाकरे मनसेबाबत आग्रही असल्याने ठाकरे बंधू…
जरागे विरुद्ध भाजप नेते आक्रमक – आंदोलकांच्या शुक्रवारच्या मोर्चामुळे मुंबईत तणाव
मुंबई /मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ तारीखला मुंबईत धडकणाऱ्या जरांगेंच्या मराठी आंदोलकांविरुध आता भाजपा नेतेही आक्रमक झाले आहेत.फडणवीसांच्या आई बद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या जरांगेना जीभ हासडून हातात देण्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.तर जरांगेना नक्षलवादी घोषित करा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे.दुसरीकडे सदावर्ते यांनी जरागे विरुद्ध पोलिस महासंचालकांकडे तक्रार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल…
आबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर
मुंबई : पुढील तीन ते चार दिवसात समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अबू आझमी यांची रविवारी रात्री उशिरा मुंबईत बैठक झाली आणि या बैठकीत पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती आहे.महा राष्ट्रातील भाजपचा एक महत्त्वाचा नेता अबू आजमी यांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याची विश्वसनीय…
जीवाला धोका असल्याच्या दाव्यातून राहुल गांधींची माघार
पुणे/काँग्रेसने पुणे कोर्टातील सावकर अवमान प्रकरणात राहुल गांधी यांच्यावतीने दाखल केलेला जीवाला धोका असलेला दावा अचानक मागे घेतला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले की राहुल गांधी यांचे हे म्हणणे परवानगी विना कोर्टात सादर करण्यात आले. सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की राहुल गांधी यांच्या वकीलांनी त्यांची परवानगी न घेताच कोर्टात हे…
खाजगी वैद्यकीय चोरबजार
वैद्यकीय क्षेत्रात काम करून रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या डॉक्टरांना साक्षात ईश्वर मानले जाते पण आजकाल हा ईश्वर राजकारणी आणि चंबळ मधील डाकू पेक्षाही भयंकर लुटारू बनला आहे.आणि या क्षेत्रात मिळणारा अफाट पैसा पाहून मोठ्या संख्येने बोगस डॉक्टर लोकांनी आपली दुकाने थाटली आहेत त्यामुळे या बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतलेल्या अनेकांवर पापले प्राण गमावण्याची पाळी आली आहे.मात्र जे…
