[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कुंभ मेळ्यातील तंबूत आग अनेक तंबू जाळून खाक

प्रयागराज – उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळाव्यात अचानक लागलेल्या आगीत तब्बल अडीचशे तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने या ठिकाणचा नजरा थरकाप उडविणारा होता. सुदैवाने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. या घटनेत कोणतीही प्राणाहानी झाली नसल्याचे एएनआयने म्हटले आहे. या सेक्टर -१९ मधील अखिल भारतीय धर्म संघ गीता प्रेस ( गोरखपुर ) यांच्या तंबुला लागली होती. परंतू ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. मात्र, जेवण बनविण्यासाठी आणलेल्या स्वयंपाकाच्या सिलिंडरने ही आग लागल्याचे म्हटले जात आहे.
जगभरातील कोट्यवधी हिंदू भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या उत्तर प्रदेशातील महाकुंभात सेक्टर -१९ मध्ये रविवारी दुपारी लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण करायच्या आधीच तिच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. तरीही या आगीत २५० हून तंबू जळून खाक झाले आहेत. आगीचे नेमके कारण समजलेले नाही. सुरुवातीच्या माहितीनुसार एका सिलींडरला आधी आग लागली नंतर हा आगीने विक्राळ रुप धारण केले. या आगीत अनेक सिलिंडरीचे स्फोट झाल्याने दहशतीचे वातावरण पसरले. या आगीत आठ ते नऊ सिलींडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने
सेक्टर – १९ मधील गीता प्रेसच्या तंबुला सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीच्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.त्यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी घटनास्थळी हजर होते.योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात सर्व उपाय योजण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी सर्व उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. यंदा १३ जानेवारीपासून सुरु झाला आहे. आणि २६ फेब्रुवारीपर्यंत भरणार आहे. १८ जानेवारीपर्यंत महाकुंभात ७ कोटींहून अधिक भाविक आणि साधूसंतांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. रविवारी ४७ लाखांहून अधिक श्रद्धाळूंनी पवित्रस्नान सोहळ्यात सहभाग घेतला आहे.

error: Content is protected !!