अरबी समुद्रात वादळी वारे मुंबईसह ११ जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई/ सध्या वातावरणात विलक्षण बदल होत असून पुढील २४ तासात अरबी समुद्रात वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने मुंबईसह ११जिल्ह्यांना हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे
वादळी वाऱ्यांमुळे उंच लाटा उसलण्याची तसेच किनारपट्टीवर आणि पावसाची शक्यता असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे मुंबईसह ठाणे ,पुणे ,अहमदनगर,धुळे नंदुरबार आदी ११ जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून एन डी आर एफ चां तुकड्या ही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.तसेच मुंबईच्या समुद्रावर या काळात फिरायला जाणे धोक्याचे ठरू शकते म्हणून शक्यतो कुणीही या काळात समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशा सूचना दिल्या जात आहेत
 
								 
															 
															 
															
 
							 
							 
							