मुंबई / शिवसेना प्रमुखांच्या जयंती निम्मित शिवसैनिक आशी सवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे यांनी सांगितले सांगितले की शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला लढायच आहे .हरलो तरी जिद्दीने लढायच आहे ममता बॅनर्जी सारखी जिद्द दाखवा यापुढे निवडणूक कुठलीही असो ती आपल्याला जिंकायची आहे दिल्ली काबीज करण्याचा बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे असा आदेशच त्यांनी आपल्या संदेशात दिला यावेळी त्यांनी भाजपची खरडपट्टी काढली
भाजपा बरोबर आम्ही युतीत २५ वर्ष साडलोो, वापर आणि फेका ही भाजपची वृती आहे आम्ही भाजपला सोडले हिंदुत्व सोडले नाही आणि सोडणार नाही भाजपने हिंदुत्वाचा फक्त कातडे पांघरलेले आहे आणि सोयीनुसार हिंदुत्वाची व्याख्या करीत आहेत भाजपने आमचा विश्वासघात केला म्हणून आम्ही पंजा उगारलाा, अमित शहा म्हणतात हिम्मत असेल तर एकट्याने लढा ठीक आहे आम्ही एकट्याने लढतो तुमच्या हिम्मत असेल तर कार्यकर्ते जसे रस्त्यावर भिडतात तसेच राजकारणात भिडून दाखवा असे जाहीर आव्हान त्यांनी भाजपला दिले .
