मुबई/ महाराष्ट्रातले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महान पराक्रमाचे आणि शिवशाहीच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहेत पण पुरातत्व विभागाचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या ३०० किल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे तर काही ठिकाणी मुस्लिमांनी अतिक्रमण करून थडगी बांधलेली आहेत तेंव्हा ही अतिक्रमणे काढून या किल्ल्यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे सोडून सरकारने मंत्र्यांच्या बांगल्याना किल्ल्यांची नावे देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो हास्यास्पद आणि महाराजांबद्दल दाखवलेला खोटा आदर आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. पाली येथील सरस गडावर २०/२५ वर्षांपूर्वी थडगे बांधण्यात आले आता तिथे मुस्लिम नियमित उरूस भरवतात तर मंगळवार असलेल्या थडग्यावर चादर चाडवली जाते .हिरालोट येथे अगोदर थडगे बांधून आता त्याच्या बाजूला भिंती उभारून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले आहे. हिरकोट गडाचा सध्या कारागृह म्हणून वापर केला जातो. शिवडीतील दर्गा हे नवनाथ पैकी एका नाथाचे ठिकाण आहे असे वयोवृध्द जाणकारांचे मत आहे. शिवडीचा किल्ला १५०० वर्ष पुरातन आहे या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सय्यद जळल शाह दर्ग्याचे प्रस्थ वाढले आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर साधारण एक एकर जागेवर दर्गा शरीफ हजरत सय्यद जलाल शहा या नावाने दर्गा आहे तिथेही अनधिकृत बांधकामे झाली आहेत. महाराजांच्या इतर किल्ल्यांची सुधा दुरवस्था झालीय त्याकडे लक्ष देण्यास ऐवजी मंत्र्यांच्या बंग्ल्याना किल्ल्यांची नवे कशासाठी असा सवाल केला जात आहे.
Similar Posts
अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय
मुंबई/ शिवसेनेच्या दोन गटातील राजकीय संघर्ष पाहता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत मोठा विजय झाला.पाणी पडले तरी मशाल विकली नाही त्यामुळे आता मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक झाली या निवडणुकीसाठी पूर्वी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयओसाड गावची पाटीलकी
मोदी आणि भाजपचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना केले आहे.तशी पत्र त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना पाठवली आहे. ममता यांचा हा पत्र प्रपच सुरू होऊन काही तास लोटले नाही तोच दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक बैठक होऊन त्यात शरद पवार यांना यूपीए…
गुन्हे | ताज्या बातम्या | मुंबई | राजकीयसचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास न्यायालयाची मंजुरी
मुंबई – अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयला सर्व प्रकारची माहिती माहिती पुरवून चांगली मदत केल्याबद्दल सीबीआयच्या शिफारशीवरून सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार बनवले आहे. दरम्यान या निर्णयाला विरोध करणारा या प्रकरणातील एक आरोपी कुंदन शिंदे याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल…
अक्षय शिंदेंचे एन्काउंटर संशयास्पद – न्यायालयाने ५ पोलिसांना दोषी ठरवले
मुंबई – अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. फॉरेन्सिकच्या अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस…
भाजपच्या माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार -मलिक
मुंबई/ सध्या रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणारे नवाब मलिक यांनी आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एका माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले त्यामुळे तो मंत्री कोण आणि त्यांचा घोटाळा कोणता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान मलिक यांना आता कुणीही गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे त्यांना काहीही बोलुदेत आम्हाला काहीही…
एस टी कामगारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; संप सुरूच
मुंबई/ राज्यसरकार मध्ये विलिनिकरन मुद्द्यावर असून बसलेल्या एस टी कामगारांनी काल कृष्ण कुंज वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी आत्महत्या करू नका कारण आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करीत नाही असे राज यांनी एस टी कामगारांना सांगितले .तसेच तुमच्या मागण्यांसाठी आपण सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे…
