मुंबई (किसन जाधव) मुंबईतील मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे मात्र या कामातील कंत्राटदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक चुका होत आहेत आणि त्याकडे एम एम आर डी ए चे अधिकारी हेतुपुरसकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर करीत आहेत .कोणत्याही नागरिक सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावले जातात त्यावर कंत्राटदाराचे नाव,कामाचा कालावधी आदींची माहिती असावी असा नियम आहे. मात्र गोरेगांव आरे कालणी येथे मेट्रोच्या पिलर नजिक एक किमी रस्त्याचे जे काम सुरू आहे तिथे नियमांची पायमल्ली सुरू असून जी एल कंपनीकडे हे काम आहे मात्र कंत्राटदार आणि कामाच्या इतर बाबी संबंधीची माहिती असलेला कोणताही फलक तेथे नाही. बेरेकेटींग नाही त्यामुळे अपघात होत आहे. या कामात जर काही त्रुटी किंवा तक्रारी असतील तर कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्याच्या कामासाठी जो खड्डा खोदून ठेवलंय त्याच्या भोवती बरेकेट्स सुधा लावलेले नाहीत उद्या समजत त्यात कुणी पाडून मेळा तर त्याची जबाबदारी एम एम आर डी ए चे अधिकारी घेणार आहेत का ? एम एम आर डी ए हे प्राधिकरण मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येते त्यामुळे एम एम आर डी ए झालेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींची जबाबदारी अर्थातच मुख्यमंत्र्यांवर येऊ शकते म्हणूनच एम एम आर डी ए चां संबधित अभिंयता नेरकर आणि अन्सारी अधिकार्यांनी इथे लक्ष घालून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे
Similar Posts
मराठा आरक्षणावरून राज्यभरात आंदोलनाचा भडका; ‘कोणाच्या ताटातील काढून देणार नाही’, फडणवीसांची ग्वाही
मुंबई:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ११ वा दिवस उजाडला असून, त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. नाशिक, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत मराठा समन्वयक व कार्यकर्त्यांकडून रस्ते अडवून जोरदार निदर्शने आणि रास्ता रोको सुरू आहेत. जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याने मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे.या…
प्रकाश आंबेडकर हे नेहमी नवा इतिहास लिहतात औरंगजेबाच्या तारिफीवर फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई – संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदुंचा सहभाग होता, या प्रकाश आंबेडकरांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “असं आहे की, प्रकाश आंबेडकर हे नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते. तिथे त्यांनी जे वक्तव्य केलं, ते सगळ्यांनी ऐकलं आहे. हिंदू असो वा कुणीही असो, हे सगळ्यांना माहीत आहे की, औरंगजेबाने छत्रपती…
मुंबई महानगरपालिका शूटिंगबॉल संघाने पटकावले अंतिम विजेते पद
ए वन संघ माणकुले ता. अलिबाग जि. रायगड आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा दि. ५ मार्च २०२३ रोजी दिवस/रात्र विद्युत झोतात कै. विश्वास शंकर पाटील क्रीडानगरी माणकुले येथे पार पडल्या. सदर स्पर्धेत राज्यातील बलाढय अशा २० संघांना निमंत्रित करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिका शूटिंगबॉल संघाने साखळी सामान्य मध्ये विजयी घोडदौड करत उपांत्य फेरीत मजल मारली…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईमांसाहाराच्या जाहिराती बघायच्या नसतील तर टिव्ही बंद करा – जैन समाजाच्या याचिका करत्याना न्यायालयाने फटकारले
मुंबई – मांसाहाराच्या जाहिराती ज्यांना बघायच्या नसतील त्यांनी टिव्ही बंद करावा पण जे मांसाहारी आहेत त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याची मागणी करू नये अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने जैन समाजातील याचिका कर्त्या लोकांना फटकारले आहे .मांसाहाराच्या जाहिरातीमुळे शांततेत आणि गोपनीय जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते . त्यामुळे मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालावी. या मागणीसाठी श्री विश्वस्त…
आता नवाब मलिखही ई डी च्या जाळ्यात – वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ७ ठिकाणी छापे
पुणे/ रोज उठून पत्रकार परिषद घेणारे आणि कोणावर ना कोणावर आरोपांची चिखलफेक करणारे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री हे सुधा आता ई डी चां चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या वक्फ बोर्डाच्या ६हेक्टर जमिनीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन वक्फ बोर्डाची नाही असे दाखवून ती बिल्डरांना…
मुंबईतील मालाड कुर्ला भागात मतदारांची संख्या प्रचंड वाढली! तर दक्षिण मुंबईत घट
मुंबई/यावेळीमुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील घोळ अजूनही संपलेला नसल्याचे दिसते. शहरातील २२७प्रभागातील मतदारांच्या संख्येत एकूण १२.६७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील काही भागात मतदारांचा महापूर आला आहे. तर काही भागात मतदारांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. पश्चिमी आणि मध्य उपनगरांमध्ये मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर दक्षिण मुंबईतील काही जुन्या भागात मतदारांच्या…
