मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मोठा विजय मिळवला होता तसेच आपल्या सरकारच्या काळात त्यांनी या मतदार संघात अनेक कामेही केलीत त्यामुळे आदित्य कडून हा मतदार संघ हिसकावण्याच्या भाजपचा प्रयत्न आहे . त्याची सुरुवात आज दहीहंडी ने करण्यात आली
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्र
तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याच भान ठेवासरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्रमुंबई/ पूरग्रस्त भागातील आता मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राज्यपालांचे सुद्धा दौरे सुरू झाल्याने सरकार विरूद्ध राज्यपाल हा संघर्ष अधिक तीव्र झाला असून काल त्याची ठिणगी पडली अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावताना तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याचे भान ठेवा असे सांगितले .तसेच राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र…
अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची दैना
कोल्हापूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हरभरा, ज्वारी,कापूस , ऊस, या पिकांच्या बरोबरच आंबा आणि इतर फळांचे तसेच पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी…
उद्वव ठाकरे यांचे भाजपला उघड आव्हान हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा!
मुंबई – सत्ता हवी असेल तर खुशाल घ्या पण महाराष्ट्राला बदनाम करु नका.महाराष्ट्रासाठी काही तरी चांगल करून दाखवा आणि नंतर सतेचे डोहाळे जेवण करा आम्ही मर्द आहोत आमच्यावर समोरून वार करा ईडी आणि सीबीआय चां आडून वार करण्याचा प्रयत्न करू नका आणि हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे उघड आव्हान आज दसरा मेळाव्यात ठाकरे…
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा प्रताप! कुख्यात गुंड निलेश धायवळच्या भावाला शस्त्र परवाना
पुणे/ कांदिवलीतील बारमुळे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रामदास कदम यांचे चिरंजीव आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. कदम यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांचा आदेश डावलून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश धायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचे उघडकीस आले आहे.आता या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली…
गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर मंडपात मुखदर्शन नाही आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी
मुंबई – गणेश भक्तांच्या लाडक्या बापचे आगमन आता काही तासांवर आलेले असतानाच राजी सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून यंदा गणेशाचे दर्शन मंडपात घेण्या येवजी ऑन लाइन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्यावं असे सांगण्यात आले आहे तसेच गणेशाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकणा बंदी असेल त्यामुळे बाप्पा वाजत गाजत न येतं अत्यंत साधेपणाने येणार आणि तितक्याच…
मनसेच्या मुद्द्यावरून:अखेर महाविकास आघाडी फुटणार
मुंबई/ उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडल्यास काँग्रेस स्वबळाचा धोरणाचा पुनर्विचार करील असे म्हणत काँग्रेसने उद्धव ठाकरेनं मनसेची साथ सोडण्यास सांगितले आहे .मात्र तसे होणार नसल्याने आता महाविकास आघाडी तुटल्यात जमा असल्याचे बोलले जातेउद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विश्वासात…
