केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे बाल विवाह कायद्यात सुधारणा करून मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१वर्ष करण्याचा! भारतीय संस्कृती आणि जुनाट रूढी परंपरा मध्ये स्त्रीवर अन्यायच झालाय. तिला चूल आणि मुल यात अडकवून ठेवण्यात आले होते.आणि सगळ्यात जर भयंकर काय असेल तर एखाद्या आठ नऊ वर्षाच्या कोवळ्या बालिकेचा बालविवाह तोही कुठल्या तरी वयस्कर माणसाबरोबर लावला जायचा त्यामुळे त्या बालिकेच्या आयुष्याची होळी व्हायची ज्याच्याशी त्याचे लग्न व्हायचे तो तिला कोवळ्या वयात कुस्करून टाकायचा.तिचे लैंगीक शोषण सुरू असतानाच पुढे दोनतीन वर्षात तिला मासिक धर्म सुरू झाला की तिच्यावर अकाली मातृत्व लादले जायचे.लहान वयात गर्भधारणा झाल्यास गर्भाशय कमजोर होऊन स्त्रीला पुढे वेग वेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागायचे .आणि लग्नाची टी बायको लहान वयातच शारीरिक दृष्ट्या कमजोर झाली की मग पुरुष पुन्हा कुठल्या तरी कोवळ्या मुलीला लग्न करून घरात आणायला मोकळा असे सगळे दुष्टचक्र सुरू होते.वास्तविक लग्न हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे लग्नासाठी स्त्री असो की पुरुष त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमताही विचारात घेणे गरजेचे असते .खास करून स्त्रीच्या बाबतीत याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा कारण गर्भधारणेसाठी तिची शारीरिक क्षमता असणे गरजेचे असते कारण बाळंतपण आणि प्रसूती नंतर स्त्रीचा दुसरा जन्म होतो असे म्हणतात ते काही खोटे नाही .कारण नऊ महिन्याचा तो काळ स्त्रीसाठी एकप्रकारचे अग्निदिव्य असते.म्हणूनच लग्नाचे वय किमान २० वर्ष तरी असावे अशी मागणी केली जात होती ती अखेर सरकारने मान्य केली असून मुलीचे लग्नाचे वय यापुढे २१वर्ष इतके असावे असा सरकार कायदा करणार आहे. त्यासाठीचे एक विधेयक तयार करण्यात आले असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरीही मिळाली आहे आता याच अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले जाईल. हे विधेयक जेंव्हा संसदेत मंजुरीसाठी येईल तेंव्हा विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये.तर सामाजिक जबाबदारी समजून ते मंजूर करण्यास मदत करावी.आपल्याकडे सध्या स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचा हक्क आहे महिलांचा विकास आणि सुरक्षेसाठी बेटी बचाव बेटी pdhao यासारखे महत्वकांक्षी अभियान चालवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मुलीचे लग्नाचे वय २१करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Similar Posts
दहा तारखेला राणी बाग पर्यटकांसाठी खुली होणार
मुंबई/ कोरोनच प्रादुर्भाव संपात आल्याने आता मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे आणि म्हणूनच मुंबईची ओळख असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बाग १० तारखेपासून खुली करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहेमुंबईतील भायखळा येथील राणीची बाग पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. कोरोनामुळे ती बंद केली होती. मात्र आता १० फेब्रुवारीपासून राणीची बाग पर्यटकांसाठी पुन्हा खुली होणार आहे….
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनमार्फत – कुर्ल्यात पोलिसांसाठी शिबिर आयोजित
कुर्ला -अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने दिनांक १३.१.२०२३ रोजी पोलीस चौकी बीट नंबर ३ येथे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्ड (आभा कार्ड) व नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागुल – चुनाभट्टी डिव्हिजन यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह(दिनांक ११.१.२०२३ ते१७.१.२०२३) च्या अनुषंगाने वरील नमूद दोन शिबिरे घेण्यासाठी विनंती केल्याने सदर शिबिरे आयोजित करण्यात आली.सुमारे…
मुंबईच्या कोस्टल रोडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा – पालिकेचे अनेक अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यात
मुंबईच्या कोस्टल रोडमध्ये कोट्यवधींचा घोटाळापालिकेचे अनेक अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यातमुंबई – मुंबैकरांच्या सोयीसाठी १४०० कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत . त्यावर आता पॅच मारून अब्रू झाकण्याचे काम पालिका अधिकारी करीत आहेत पण या सर्व प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करावी तसेच यात सामील असलेल्या अधिकार्यांना…
स्पोर्ट्सफिल्डला अजित घोष ट्रॉफीचे विजेतेपद
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुनम राऊत (45) आणि ऑफस्पिनर समृद्धी राऊळ (19 धावांत 3 विकेट्स) यांच्या चमकदार खेळाच्या बळावर स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबने मुंबई पोलीस जिमखान्याचा 9 विकेटने पराभव करून अजित घोष स्मृति चषक महिला टी-ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद सहज जिंकले. स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पोलीस जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना 20…
पालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेच्या वाट्याला अवघ्या ६५ जागा? कार्यकर्ते नाराज
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर कब्जा करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेत १५० पारचा नारा भाजपाने दिला आहे. मुंबईत महायुतीचा महापौर बसेल असा दावा भाजपासह घटक पक्ष करत आहेत. त्यामुळे महायुतीत शिंदेसेनेच्या वाट्याला फक्त ६५ ते ७० जागा…
शिवसेनेच्या निवडून आलेल्या संख्या 100 वर
मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या आता 100 वर पोहोचली आहे. 2017 मध्ये कुर्ला प्रभाग क्र. 159 मध्ये निवडून आलेले भाजपचे प्रकाश देवजी मोरे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शिवसेनेच्या कोमल जामसंडेकर यांची नगरसेवक म्हणून निवड झाली आहे.त्यामुळे शिवसेनेच्या निवडून आलेल्या 98 नगरसेवकांसह व दोन स्वीकृत नगरसेवकांसह नगरसेवकांची संख्या 100 वर…
