बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा बंदोबस्त करा- मंगल प्रभात लोढा
मुंबई – मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची गोष्ट आहे. खोटे आधार कार्ड घेऊन बांगलादेशी आणि रोहिंग्या हे घुसखोर आपल्या देशात येत आहेत, फेरीवाले, भाजीवाले, छोटे विक्रेते म्हणून आपल्यात वावरत आहेत आणि आपल्याच नागरिकांना धमकावत आहेत. आज जर यावर कारवाई केली गेली नाही तर हे घुसखोर संपूर्ण मुंबई काबीज करतील. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गिरगाव मधील अशाच ८ घुसखोरांची खोटे आधार कार्ड जप्त केले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मुंबई पोलीस आयुक्त माननीय देवेन भारती जी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
दरम्यान, मालवणी परिसरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यात नऊ हजार चौरस मीटर जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. मोठ्याप्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंगे आढळून आले आहेत. कायदेशीर करवाई झाली असून सुद्धा पाडलेल्या झोपड्या पुन्हा पत्र्याच्या शेडच्या स्वरूपात उभ्या करण्याची तयारी येथे सुरु झाले आहे. अधिक तपास करून पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी केली.

