मुंबई – महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आल्याने आता जुन्या पदपथांची दुरुस्ती व सुशोभीकरणाचा कामे काढण्यात आली आहे.यासाठी आतापर्यंत ७० कोटी रुपये खर्चाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर कुलाबा ते दादर या भागात ३३ पदपथांच्या सुशोभीकरणासाठी ५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दशकभरापूर्वी मुंबईतील पदपथांवर सर्रास पेव्हर ब्लॉक लावले जात होते; या .जागी आता सिमेंट काँक्रीट किंवा काँक्रिटच्या लाद्या बसविल्या जाणार आहेत.
त्यानंतर वांद्रे पूर्व येथील आर.के. रोड व संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यालगतच्या पट्टा व पदपथ यांची मास्टिक असफाल्ट व सिमेंट काँक्रीटमध्ये सुधारणा करण्याचा २१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
. वडाळा येथे लेडी जहांगीर मार्ग ते सेेंट जोसेफ चर्च सर्कल, वडाळा रेल्वे स्थानक ते रुईया कॉलेज, चेंबूर येथील महर्षी दयानंद मार्ग, डायमंड गार्डन ते चेंबूर रेल्वे स्थानक यादरम्यान दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
