मुंबई/ अनिल परब यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनीच कागदपत्र पुरवली असा आरोप आहे याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्यामुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे चांगलेच संतप्त झाले असून ते रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते मात्र रामदास कदम यांनी आपल्यावरच आरोप फेटाळले असून ऑडिओ क्लिप मधील आवाज माझा नाही असे म्हटले आहे पण शिवसेनेत आता जुने विरुद्ध नवे असा वाद उफाळून आले काही दिवसांपूर्वी माझी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी महा विकास आघाडीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती त्यामुळे गीते यांनाही पक्ष नेतृत्वाने समाज दिली आहे .
Similar Posts
गोव्याशी आमचे भावनिक नाते- आदित्य ठाकरे
पणजी – गोव्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली असून आज आदित्य ठाकरे यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदार संघात प्रचार सभा घेऊन त्यांना आव्हान दिले . तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला . ज्यात गोवेकरांसाठी आश्वासनांची खैरात आहे. आज राहुल गांधी यांनीही गोव्यात प्रचार केला .मात्र भाजप उमेदवारांच्या प्रचाराला…
यंदा गरिबांची दिवाळी गोड होणार – फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज शंभर रुपयात
मुंबई – सध्या महागाईने शिखर गाठलेले आहे. घरगुती वापराच्या गॅस पासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंतच्या दरात वाढ होत आहे . त्यामुळे सणासुदीच्या काळात गोर गरीब जनतेची मोठी आर्थिक कुचंबणा सुरु होती. मात्र राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावरच चणाडाळ,खाद्य तेल,रवा आणि साखर या फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज रेशन दुकानांवर फक्त १०० रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ दारिद्रयरेषेखालील…
राज्यपाल कोश्यारी यांना मानवंदना व निरोप
मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचे मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे प्रस्थान झाले.
लोकशाही टिकविण्यासाठी चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा
क द न्या. मृदूला भाटकर यांचे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचा 81 वा वर्धापनदिन साजरा मुंबई, दि. 22 – वस्तूनिष्ठ लेखन असलेली पत्रकारिता जोपर्यंत आहे, तोपर्यंत लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचे, पर्यायाने लोकशाहीचे आणि चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा, असे आवाहन महनीय प्रवक्त्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांनी केले. मुंबई मराठी…
करोना काळातील पालिकेच्या 12 हजार कोटींच्या घोटाळ्याची कॅग कडून चौकशी होणार
मुंबई/ कोरॉना काळात मुंबई महापालिकेत 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने कॅगला दिलेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग (कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ…
विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार
मुंबईतील विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बदलण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची सोमवारी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ…
