मुंबई– मुंबई शहरातील बेस्ट, रिलायन्स एनर्जी ,महानगर टेलिफोन निगम महानगर गॅस व अन्य कंपण्यांकडून खणलेल्या चारी बुजवण्यासाठी पालिकेकडून दुप्पट दराने शुल्क वसूल करण्यात येते आणि स्ट्रेच म्हणजे चार भरण्यासाठी 350ते 400 कोटी कंत्राटदारच्या घशात घालण्यात येतात पण चर नियमाने न भरल्याने पुन्हा खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांचे खिसे भरले जतातसा हा सगळं मुंबईकरणा चुना लावण्याचा खेळ सुरू आहे यात प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली असल्याचे पालिकेचे कंत्राटदारच दबक्या आवाजात सांगतात खड्डे भरण्यासाठी 24 विभाग कार्यालय निहाय कत्रा ट दार नियुक्ती करण्यात येते . त्यासाठी मर्जीतले कंत्राटदार निवडून अगोदर टक्केवारी ठरवली जाते . यंदा प्रत्येक विभागासाठी 2 कोटी रुपये असे 48 कोटींची तरतूद करण्यात आली आहे .यंदा रस्त्याच्या कामासाठी 1.20कोटी किमतीच्या 31 निविदा काढण्यात आल्या आहेत या सर्व निविदामद्धे 26ते33 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी कंत्राटदारणी का दाखवली ? हे वेगळे सांगायची गरज नाही अशा पद्धतीने पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालणारे कंत्राटदार आणि पालिका अधिकार्यांचे हे रॅकेट उध्वस्त करण्याची वेळ आता आली आहे . विरोधी पक्षात असलेल्या भाजपने त्याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी मुंबईकरणी केली आहे .
Similar Posts
सत्तेसाठी एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्यांमध्ये रस्सीखेच होणार
मुंबई/राजकारणात कोणीही दांडगाई करू नये ,दांडगाई करणाऱ्यांची काय अवस्था होते ते लोकसभा निकालाच्या दिवशी दिसून आले देशात लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांसाठी सात टप्प्यात झालेल्या निवडणुकीत निकाल लागला या निवडणुकीत 400 च्या वल्गना करणाऱ्या भाजपला तीनशे जागाही मिळाल्या नाहीत भाजप आघाडीला देशभरात 294 जागा मिळाल्या तर भाजपला 242 याउलट राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने झेप घेत…
उभारू नव संकल्पाची गुढी
आज गुढी पाडवा ! साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! गुढी पाढव्याने हिंदू नव वर्ष रभ होतो.त्यामुळे घरावर गुढ्या तोरणे उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची पद्धत आहे. नव वर्षाचा आज प्रारंभ असल्याने आजच्या दिवशी नवे संकल्प करायचे असतात आणि पुढे वर्षभर ते संकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.या वर्षीच्या गुढी पाडव्याच्या वैशिष्ट म्हणजे हा गुढीपाडवा निर्बंध मुक्त…
टाकवे गावात नाथा प्रतिष्ठानतर्फे चित्रकला स्पर्धा
टाकवे -सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील टाकवे गावच्या टाकवे हायस्कूलचे संस्थापक दिवंगत कर्मयोगी नाथा शेठ जाधव यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त १८ जानेवारी २०२३ रोजी शालेय सांस्कृतिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त पंचक्रोशीतील टाकवे, बाबवडे , पाचुंबरी, वाटेगाव , धामवाडी, पनुबरे, गिरजवडे, भैरववाडी , शिवरवाडी , घांगरेवाडी, पुदेवाडी, या सर्व शाळांमधील पहिली ते दहावी…
लखन भय्या बनावट एन्काउंटर प्रकरणी – एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप
मुंबई – प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. हायकोर्टाने लखनभैय्या फेक एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई हायकोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर प्रदीप शर्मा यांना येत्या तीन आठवड्यात आत्मसर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील इतर आरोपींनादेखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ नोव्हेंबर २००६…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईची सुरक्षा रामभरोस
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ही एक जागतिक कीर्तीची मोठी बाजारपेठ आहे.शिवाय औद्योगिक महानगर असल्याने इथली लोकसंख्या जवळपास 3 कोटींचा आसपास आहे.त्यामुळे येवढ्या मोठ्या शहरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून ज्या उपाययोजना व्हायला हव्या होत्या त्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळे हाय सिक्युरिटी झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरियमधे सुधा गुन्हेगारी घटना घडत आहेत बुधवारी भर दुपारी मुंबई उच्च…
कुपवाड्यात दोन दहशतवाद्यांचे एन्काउंटर
श्रीनगर/जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. ते नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. सूत्रांचे म्हणणे आहे की मृतदेह नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ पडले आहेत.सीमेपलीकडून गोळीबाराच्या धोक्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेत लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांचे संबंध अद्याप जाहीर झालेले नाहीत.गेल्या आठ दिवसांत…
