: मुंबई – सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या गंभीर आरोप करून त्यांना ईडी च्या तावडीत देण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र सोमय्यानं येवढी माहिती कुठून मिळते याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती .अखेर खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी याबाबतचा गौप्यस्फोट करताना या सगळ्या मागे रामदास कदम असल्याचे संगितले .रामदास कदम यांचा एक खास माणूस आणि सेनेचा कार्यकर्ता प्रसाद कर्वे यानेच आर टी आय च्या माध्यमातून माहिती कडून ती किरीट सोमय्या यांना पुरवली .त्यामुळेच बेहिशोबी मालमतेमधून अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट उभा राहिला . त्याची माहिती सोमय्यानं देण्यात आली असे खेडेकर यांनी संगितले .मात्र रामदास कदम यांनी खेडेकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत . तर या घटनेमुळे कोकणातील शिवसेनेत मोठी खळबळ मजली आहे
Similar Posts
ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर अखेर शिवसेना सोडून भाजपात जाण्याच्या तयारीत
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता दादरच्या वसंत स्मृतीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई…
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारतीचा उद्घाटन व पायाभरणी सोहळा संपन्न
मुंबई/ स्व.वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारीचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील सायन येथे पार पडला. विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर आणि महाराष्टॄ राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रमाला माजी आयएएस अधिकारी कुंभार,जस्टीज अनंत पोतदार, मा.अतिरिक्त आयुक्त विक्रमसिंह पाटणकर ,मा. नगरसेवक…
महाराष्ट्र भाजपचे नवीन कार्यालय उद्घाटन
महाराष्ट्र भाजपचे नवीन कार्यालय मुंबईत ५५,००० चौरस फूट, १५ मजली, ९० कोटी रुपयांच्या भूखंडावर बांधले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ केला. दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसरात बांधण्यात येणारे हे नवीन कार्यालय दोन वर्षांत पूर्ण होईल. भाजप कार्यालय आलिशान असेल. एकदा पूर्ण झाल्यावर पक्षाचे अधिकारी अतिथीगृहांमध्ये…
वांद्रे- वर्सोवा सीलिंकल सावरकरांचे नाव
मुंबई/ वांद्रे-सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा काळ मुख्यमंत्र्यांनी केली . तसेच सावरकरांच्या नावाने शौर्य पुरस्कारही दिला जाणार आहेशिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर 13 मार्चला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून कोस्टल रोडला संभाजी महाराजांचे,तर वांद्रे वर्सोवा सी लिंकला सावरकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती . त्यानुसार सी लिंकला सावरकरांचे नाव देण्यात…
उध्दव ठाकरे फडणवीस यांच्यासह भाजपच्या ५ नेत्यांना तुरुंगात टाकणार होते- मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
*मुंबई/लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंगात आलेल्या आहे आणि सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. एकमेकांची उनी धुनी काढत आहेत यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेत अक्षरशा एकमेकांचे लफडी बाहेर काढण्याची स्पर्धा लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावर कठोर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही…
ठाकरे बंधूंचे एकी झाल्यास महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता
पुणे/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.काँग्रेसचा एक गट या युतीबाबत सकारात्मक आहे तर दुसरा गट मात्र विरोधात आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच आहे मात्र राज ठाकरेना माविआ मध्ये घेण्याबाबत आघाडीच्या नेत्याशी चर्चाकरावी लागेल असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले.ठाकरे…
