मुंबई – महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजपचे माजी खासदारकीरीत सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्याला प्रशासनाने विरोध केला असून तिनं कोल्हापूर जिल्हा बंदीची नोटिस बजावण्यात आली आहे . इतकेच नव्हे तर सरकारने त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली आहे ही माहिती स्वता सोमय्या यांनीच दिली .सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसणं मुश्रीफ यांचा 127 कोटींचा घोटाला बाहेर काढल्यापासून सोमय्यंच्या विरोधात आघाडी सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे . सरकार मधील तिन्ही पक्षांच्या मागण्या नुसार सोमय्या यांच्याकडे भ्र्ष्टाचाराचे कोणतेही पुरावे नसून ते केवळ स्टंट बाजी करीत आहेत . सोमय्या यांनी आतापर्यंत परिवाहनमंत्री अनिल परब सेनेच्या खासदार भावना गवळी आणि आता हसणं मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत . दरम्यान काल सोमय्या यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी पोलिस पोहचताच भाजपा नेत्यांमद्धे खळबळ माजली कारण सोमय्या रविवारीच मुंबईवरून महालक्ष्मी एक्स्प्रेसणे कोल्हापूर निघणार होते . तत्पूर्वी ते गिरगाव चौपाटीवर जाऊन गणेश विसर्जन मोहिमेत सहभागी होणार होते . पण पोलिसांनी त्यांना रोखले मात्र साडेसहाच्या दरम्यान ते गिरगाव चौपाटीकडे रवाना झाले .मात्र त्यांच्या कोल्हापूर प्रशासन विरुद्ध कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांनी नोटिस बजावलेली असल्याने त्यांच्या अटकेच्या हालचालींना वेग आलाय .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर – माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचे बांधकाम तोडले
मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे…
माहीम गडावर अतिक्रमण करणार्यांना मोफत घरांचे बक्षीस
मुंबई -कोण्याही जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ती बळकावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अतिक्रमण करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अतिक्रमण हटवल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मोफत घरांचे बक्षिस दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे.माहीम गडावर अशाच प्रकारचे अतिक्रमण करून काही झोपड्या बांधण्यात आल्या होत्या मात्र दुर्ग प्रेमींच्या…
सलमान भाईजान पुन्हा माफिया बिष्णोईच्या रडारवर
मुंबई – बोललीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणार्याने राखी सावंतच्या इ मेलवर हा धमकीचा मॅसेज टाकला होता . या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेतसलमान खान याला यापूर्वीही रवी बिष्णोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे . राखी सावंत हिच्या मेल आयडीवर पाठवलेल्या या…
मागाठाणेत पंतप्रधान मोदींच्या-१०० व्या मन की बात’ चे आयोजन
‘ केंद्रीय मंत्री पियुष गोयलही उपस्थित राहणार मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १०० वा भाग उद्या रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी प्रसारित होणार आहे. पंतप्रधान मोदी मन की बातमधून आपले विचार देशातील जनतेसमोर मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आपल्या मागाठाणे मतदार संघात पंतप्रधान…
कथा दोन हजारांच्या नोटेची; व्यथा नोटाधारकांची !
रिझर्व बँकेने गेल्या शुक्रवारी मोठी घोषणा करून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या. सुमारे सहा वर्षांपूर्वी या नोटा बाजारात सादर केल्या होत्या. रिझर्व बँकेला असे वाटते की मोठ्या प्रमाणावर काळा पैसा या नोटांमध्ये दडलेला आहे किंवा बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच कर चुकवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. याची सत्यता आणखी काही…
शिवसेना राष्ट्रवादीतील वाद चिघळणार
मुंबई/ जिल्ह्याच्या विकास निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध शिवसेनेचे आमदार विकास कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . त्यानंतर कांदे यांना धमकी आल्याचे सांगण्यात आले या कथित धमकिवरून आता नाशिक मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री हेच आमचे न्यायधिश…
