मुंबई/ नालेसफाई मधील हातसफाई हा सत्ताधारी शिवसेना,पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या जिव्हाळ्याचा आणि कमाईचा विषय असल्याने यंदा नालेसफाईचा लगीन घाईसाठी पालिका उतवली झाली आहे.२०२२ चां निवडणुका कधीही जाहीर होऊन आचार संहिता लागेल आणि या आचारसंहितेत नालेसफाईच्या निविदा अडकु नयेत म्हणून पालिकेने हिवाळ्यातच म्हणजे डिसेंबर मध्येच नाले सफाईच्या २७ कोटींच्या निविदा काढल्यात मुंबईच्या पूर्व उपनग्रासाठी या निविदा आहेत आणि त्या दोन टप्प्यातील नाले सफाईसाठी आहेत पहिल्या टप्प्यात कुर्ला एल वार्ड,चेंबूर एम वार्ड, व मानखुर्द एस पश्चिम साठी १०.८३ कोटी तर दुसऱ्या टप्प्यासाठी १.७२ कोटी तसेच एम घाटकोपर ,एस भांडुप आणि टी मुलुंड साठी पहिल्या टप्प्यात १३.८३ कोटी तर दुसरा टप्पा १.१८ कोटी अशा रकमेच्या या निविदा आहेत. २०२० मध्ये कोरोना काळात चार वेळा निविदा कडूनही कंत्राटदार न मिळाल्याने अस्थायी संस्थांकडून काम करून घेण्याचे ठरले होते पण त्यांनीही असमर्थता दाखवली जुन्याच कंत्राटदाराकडून काम करून घेण्यात आले मागील काही वर्षात फेब्रुवारी मार्च मध्ये निविदा मागवून एप्रिल मध्ये स्थायी समितीत प्रस्ताव आणण्यात आले मात्र उशिराने असलेल्या या प्रस्तावना स्थायी समितीत आडकाठी येत असल्याने यावेळी डिसेंबर मध्येच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली.
Similar Posts
मुंबईत आज २७४ कोरोना बाधितांची नोंद
मुंबई – एकीकडे देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना मुंबईतील रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. आज मुंबईत नवीन २७४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर२१६ रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी आज 13 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आज कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही.मुंबईत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1635 वर पोहोचली आहे. आतापर्यंत रुग्णालयात…
प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.
अपक्ष आणि बंडखोरांना महायुती व महाविकास आघाडी कडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेचां २८८जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली. जवळपास ६६% मतदान झाले होते. शनिवारी या निवडणुकीचा निकाल आहे .परंतु एक्झिट पोल नुसार महायुती आणि महाआघाडी दोघांमध्ये काटे की टक्कर असल्याने दोन्हीकडच्या लोकांनी आता अपक्ष आणि बंडखोरांवर जाळे टाकायला सुरुवात केली आहे.महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना सरकार स्थापन करायचे आहे .त्यासाठी संख्याबळाची जुळवा…
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे राजीनामा देणार
पुणे/राष्ट्रवादीतील फुटी नंतर अजित पवार सरकारमध्ये सामील झाले मात्र आता राष्ट्रवादीचे मावळचे खासदार अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याने पवारांना आणखी एक मोठा धक्का बसलाय अमोल कोल्हे हे मावळ मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते लोकसभेतील त्यांचे काम अत्यंत चांगले होते लोकसभेतील त्यांची भाषणे ही चांगली गाजली त्यामुळे शरद पवार त्यांच्यावर खुश होते परंतु…
माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा, न हटवल्यास- गणपती मंदिर उभारणार- राज ठाकरेचा इशारा
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक व्हिडीओ दाखवत शिवाजी पार्क येथील सभेत गौप्यस्फोट केला. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी…
७ डिसेंबरला मुंबईत पाणी कपात
मुंबई महानगरपालिकेच्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने तज्ज्ञ समितीकडून पाहणी करण्यात येणार आहे. या कारणांनी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडीत असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी ७ डिसेंबर रोजी होणारा पाणीपुरवठा खंडीत लक्षात घेता मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी कामासाठी आयआयटी…
