मुंबई/ साकीनाका बलात्कार प्रकरणानतर सरकारची झोप उडाली असून आरोपी हा उत्तर भारतीय असल्याने परप्रांतीयांचा राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा उशिरा का होईना सरकारला पटला असून गंभीर गुन्ह्यातील बहुतेक आरोपी हे परप्रांतीय असल्याचे निष्पन्न होत असल्याने यापुढे मुंबईसारख्या महानगरात परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत .परप्रांतियांना हा पहिला धक्का आहे मात्र भाजपने सरकारच्या या भूमिकेवर संताप व्यक्त केल्याने आता पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण होणार आहे.
भारतीय संविधानानुसार देशातील कुठलाही नागरिक देशाच्या कुठल्याही राज्यात जाऊन कामधंदा करू शकतो तिथे वास्तव्य करू शकतो त्यामुळे देशातील काना कोपऱ्यातून पोट भरण्यासाठी लोक मुंबईत येतात पण युपी बिहार मधून आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली तसेच इथल्या भूमिपुत्रांच्या हक्काच्या नोकऱ्या परप्रांतीयांच्या पदरात पडू लागल्या परप्रांतीय मुंबईत येवून कुठेही चार बांबू ठोकून झोपड्या उभारू लागले रस्ते आणि फूटपाथ सुधा त्यांनी ठेवल्या नाहीत. शिवाय इथे येवून ते इथल्याच लोकांशी दादागिरी वागू लागले सरकारी खात्यातील बाबूंना चिरीमिरी देऊन आधारकार्ड पासून रेशन कार्ड पर्यंत निवासाचे सर्व पुरावे बनवून इथे हक्क सांगू लागले. त्यामुळे राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आंदोलने केली त्यात त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटकही झाली पण त्यांनी आपलं परप्रांतीय विरोध सोडला नाही मात्र सकिनाक्यातील. घटनेनंतर आरोपी हा उत्तर भारतातील निघाला आणि त्याने क्रौर्याचा कळस केला म्हणून आता महिलांच्या सुरक्षेबाबत उपाय योजना करताना इथल्या परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा तसेच रीक्षांचे बेकायदेशीर हस्तांतर थांबवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्यांचा हा आदेश वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे
बॉक्स/मराठी लोक बलात्कार करीत नाहीत का ? चंद्रकांतदादा
परप्रांतीयांनी बलात्कार केल्यामुळे त्यांच्या नोंदी ठेवण्याचे आणि रिक्षाचे हस्तांतर रोखण्याचे मुख्यमंत्री कसा काय आदेश देऊ शकतात बलात्कार परप्रांतीय च करतात का ? मराठी माणूस बलात्कार करीत नाही का? असा निर्लज् सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे
