मुंबई/ रविवारी गेलच्या मुख्य पाईप लाईन मध्ये मध्ये बिघाड झाल्याने सी एन जी चा पुरवठा ठप्प झाला होता.त्याचा परिणाम रविवारी रात्री पासूनच प्रवासी वाहनांवर झाला होता.मात्र सोमवारीही पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने सी एन जी वर चालणाऱ्या टॅक्सी,रिक्षा खाजगी वाहने ठप्प झाली .परिणामी मुबई ठाणे आणि नवी मुंबईतील चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले.
सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसला आहे सोमवारी दिवसभर गॅस पंप समोर वाहनांच्या रंग लागल्या होत्या. आहे. असं असलं तरी घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचं महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वडाळा येथील एम जी एलच्या सिटी गेट स्टेशनला होणारा सीएनजी गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर झाल्याचं पाहायला मिळतंय.
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खाजगी वाहनांना या टंचाईचा सामना करावा लागला. हा पुरवठा कधीपर्यंत पूर्ववत होणार याची निश्चित माहिती नाही. त्यामुळे सोमवारी वाहतुकीवर, प्रवाशांवर आणि सार्वजनिक वाहनसेवेवर मोठा परिणाम झाला.रेल्वे स्थानकांपासून पुढे रिक्षा टॅक्सीन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले.पाईप लाईन मधील बिघाड सोमवारी रात्री उशिरा पर्यंत पूर्ववत झाला नव्हता.

