दादरच्या कबूतर खाण्याजवळ राडा!न्यायालय आणि पालिकेचा आदेश झुगारून ताडपत्री हटवली
दादरच्या कबुतरखान्यावरील महापालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढत विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र आजही कबूतर खाना परिसरात जैन समाज आज आंदोलन करणारे होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळच्या वेळात मोठा जैन समाज दादरच्या कबुतरखाना परिसरात जमला असून पालिकेकडून कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली होती, ती काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि जौन समाजातील आंदोलकांमध्ये मोठी बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून दादर कबूतर खाना बंद करण्यात आला. मात्र, कबुतरखाना बंद केल्यानंतरही मनाई असताना लोकांनी कबूतरांना धान्य टाकल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पालिकेकडून कठोर पाऊल उचलण्यात आले .