ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नॅशनल हेरॉल्ड वरून पुन्हा काँग्रेस भाजपा आमने-सामने


पुणे/नॅशनल हेरॉल्ड प्रकारे पुण्याच्या काँग्रेस भावना समोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते ही जमले. आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी तसेच धक्काबुक्की झाली. या राडेबाजीमुळे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण आणखी चिघळणार आहे .
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही नेते आरोपी आहेत. या प्रकरणाची ईडीने चौकशी करून आता आरोप पत्रही दाखल केले आहे. दरम्यान भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे .नॅशनल हेरॉल्ड च्या माध्यमातून काँग्रेसने दोन हजार कोटी हडपण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या विधानानंतर दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस नेत्यांनीही भाजपवर गंभीर आरोप करायला सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यात काँग्रेस कोणासमोर जोरदार आंदोलन केले. भाजपा कार्यकर्ते काँग्रेस भवना जवळ आल्याचे समजतात काँग्रेसचे कार्यकर्ते ही त्या ठिकाणी जमले आणि दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांच्या मध्ये बॅरिगेड उभे केले .आणि दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. घोषणाबाजी सुरू होती. अखेर काँग्रेस भवनाला संरक्षण देण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौज मागवण्यात आली. मात्र या प्रकरणाचे आता राज्याच्या इतर भागातही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेस भावना समोरील राडेबाजी प्रकरणात दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असल्याचे समजते.

error: Content is protected !!