[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हिंदी विरुद्ध मनसेची मराठी जागर परिषद

मुंबई/केंद्र सरकारने हिंदी भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य केल्यामुळे मनसेने केंद्राच्या या निर्णयाच्या विरोध करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. दरम्यान हिंदी भाषेचा विरोध कायम ठेवून मनसेने आता मराठी जागर परिषद सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक भागात मराठीचा आग्रह धरला जाणार आहे. मराठीच्या व्याप्तीसाठी मराठी साहित्यिकांची मदत घेतली जाणार आहे .हिंदी विरुद्ध अशा तऱ्हेने मनसेने रणसिंग फुंकल्या नंतर भारतीय जनता पार्टीची मोठी अडचण झालेली आहे. कारण केंद्राच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातील भाजपा आणि महायुतीतील राष्ट्रवादी व शिवसेनेने जोरदार समर्थन केले आहे. त्यामुळे आता महायुती आणि मनसेमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मनसेची स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून लिहिण्यात आली आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. मनसेचा हा विरोध केवळ थातूरमातूर असून आपल्या इतर निर्णया प्रमाणेच राज ठाकरे हिंदीला असलेला विरोधी आज ना उद्या मागे घेतील असेही ठाकरे गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!