६ जानेवारी २०२२ पत्रकार दिन बाळ शास्त्री जांभेकर यांचा आज जन्म दिवस मुंबईतील इलीकस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना समाजात वावरत असताना शास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश याबरोबरच अनेक रूढी चाली रीती अज्ञान दारिद्रय भाकड समजुती यामुळे समाज कसा व्याधीग्रस्त झालाय या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवलं की केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही.तर संपूर्ण समाजाला धडे दिले पाहिजेत श्रीपती शेषाद्री नावाच्या मुलाला योग्य मार्ग दाखवला मात्र लवकरच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढायला हवं असं त्यांना वाटू लागले त्या जाणवतेन आपले सहयोगी गोविंद कुमठे आणि भाऊ महाजनच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र काढलं. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठीत ठेवण्यात आली. तरी ब्रिटिश सरकारपर्यन्त आपला आवाज जावा या हेतूने वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा वृत्तपत्राची किंमत एक रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारं हे वृत्तपत्र या अंकात दोन स्तंभ असायचे उभ्या मजकुरात एक स्तंभ कॉलम मराठीत तर एक स्तंभ इंग्रजीत असे मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहलं हे राज्यकर्त्यांना कळावं यासाठी इंग्रजी मजकूर होता वृत्तपत्राची संकल्पना त्यावेळी लोकांना नवी होती. त्यामुळे दर्पणची वर्गनी सुरवातीच्या काळात कमी होती. पण हळू हळू ही संकल्पना रुजली त्यातील विचारही रुजले प्रतिसाद वाढला दर्पणवर प्रथमपासूनच बाळ शास्त्री जांभेकरांच्या व्यक्ती महत्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्ष चालले दर्पणचा शेवटचा अंक जुलै १८४० हा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पण वृत्तासोबत मराठीतील पाहिल मासिक दिग्दर्शन त्यांनी जुलै १८४० साली सुरू केले. दिग्दर्शन मधून भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन, नकाशे आकृतीच्या साह्याने प्रसिद्ध केले. या माध्यमातून त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला. ६ जानेवारी १८३२ रोजी जांभेकर पाहिलं दर्पण हे मराठी वृत्तपत्र काढलं दर्पण या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेचा मजकूर असायचा तो लोकांना आवडू लागला. त्याच बरोबर सार्वजनिक ग्रंथालयाच महत्व ओळखून बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. हिंदुस्थानी भाषेचे ते अध्यापन करत त्यांच्या प्रकाशित साहित्य कृतीमध्ये लेखी कथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप हिंदुस्थानाचा इतिहास शून्यलय गणित या ग्रंथांचा समावेश आहे. दर्पण हे बाळ शास्त्री यांनी त्यांच्या हातातील एक लोकशीक्षणाच माध्यम होतं. त्याचबरोबर पुनर्विवाहाच्या चळवळी झाल्या ज्ञान, बौद्धिक, विकास ह्या गोष्टी अनेक त्यांना महत्वाच्या वाटू लागल्या त्यामुळे त्यांच विचारमंथन होवून त्याच रूपांतर पुढं विधवा, पुनर्विवाहांच्या चळवळीत झाला. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणं हे त्यांचं स्वप्न होते. थोडक्यात आज सारख्या ज्ञाननिष्ठ समाज त्यांना २०० वर्षां पूर्वीचा अपेक्षित होता. असे हे बाळ शास्त्री जांभेकर यांना कोटी कोटी प्रणाम असा हा ६ जानेवारी २०२१ पत्रकार दिन.|पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा|
Similar Posts
शाळा चालू होण्याची चाहूल लागताच स्कूल बसच्या भाड्यात ४० टक्के वाढ
मुंबई/ आजकाल कुठेच माणुसकी शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे संकटात संधीचा फायदा घेण्यासाठी सगळेच स्वार्थी लोक तयार असतात म्हणून तर शाळा सुरू होण्याची चाहूल लागताच स्कूल बस मालकांनी ३० ते ४० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . करीनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत त्यातच लॉक डाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं रोजगार गेलाय त्यामुळे लोक…
ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांना मारहाण
ठाणे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज हा पालिकेचे सहाय्य्क आयुक्त महेश आहेर यांचा असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर याना बेदम मारहाण केली .या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आहेर हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. या…
गिरगाव चौपाटी येथे मनसेची स्वच्छता मोहिम
समुद्र किनारा केला कचरा मुक्त मुंबादेवी:11(बातमीदार) मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व समुद्र किनारे आणि चौपाटया स्वच्छ करुन पर्यावरणाचे रक्षण करण्याची मोहिम आज सकाळी 11:30 वाजता गिरगाव चौपाटी तसेच दादर चौपाटी येथून सुरु करण्यात आली.गिरगाव चौपाटी येथे मनसेचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी दिवंगत चीफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत…
आपापल्या धर्मातील शांती संदेशधर्म गुरूंनी समाजात रुजवावा
ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचे आवाहनमुंबई (प्रतिनिधी) : देशात धार्मिक विद्वेषाचा वनवा पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. अशा वेळी सर्व धर्मातील धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील शांतीचासंदेश समाजात रुजवून विद्वेषाचा वनवा शांत करावा, असे आवाहन वारकरी विचार मंचचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी…
शिवसेना- शिंदे गट आमने सामने- दसरा मेळाव्यात राडा होण्याची शक्यता
मुंबई/ महाराष्ट्र समोर समस्यांचे डोंगर उभे असताना इथल्या राज्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करूंन मुंबईकरांचे टेन्शन वाढवण्याची अवदसा आठवली.शिवसेनेचे सोडा त्यांचा दरवर्षी दसरा मेळावा होतो पण शिंदे गटाचे काय? तुम्ही सत्ते मध्ये आहात तेंव्हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची होती . पण शिवसेनेच्या विरोधात गेलेल्या लोकांना मुंबईत आणून वातावरण तापवणे .मुंबईच्या शांततेला डिस्टर्ब करणे…
जम्मू काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचे एन्काऊंटर- पहेलगावच्या दहशतवाद्यांवर २० लाखांचे इनाम
श्रीनगर/ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तर कठोर कारवाई करू असा पंतप्रधान मोदींनी इशारा दिल्यानंतरही ,पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून सीमेवर गोळीबार सुरूच आहे. आज जम्मू-काश्मीरमधील सोफिया भागात दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक झाली. यात तीन दहशतवादी मारले गेले. तर ऑपरेशन सिंदूर कायमचे थांबवलेले नसून, केवळ स्थगित करण्यात आले आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
