‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम राहणार आहेत. म्हणूनच शारदामाईंचे सद्गुण अंगिकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाददादा पै यांनी श्रद्धांजली वाहिली. जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई पै यांचे २५ जानेवारी रोजी महानिर्वाण झाले. वयाच्या ९७ व्या वर्षी माईंनी अखेरचा श्वास घेतला. जीवनविद्या ज्यांच्या मुळे सद्गुरु श्री वामनराव पै यांना स्फुरली त्या माईंचे वृद्धापकाळाने निधन झाले. जीवनविद्या मिशनच्या वतीने दादर येथील योगी सभागृहात शारदामाईंना आदरांजली वाहण्यासाठी ‘तेजोवलयांकिता शारदा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य नामधारकांनी व्हिडिओ च्या माध्यमातून तसेच प्रत्यक्षात माईंच्या आठवणींना उजाळा दिला. हरीपाठ, संगीत जीवनविद्येच्या माध्यमातून माईंना संगीतपुष्प अर्पण करण्यात आले. तसेच यावेळी नातसून प्रिया निखिल पै यांनी शारदा माईंच्या असंख्य आठवणी नामधारकांसमोर मांडल्या. पण एक आजी सासू म्हणून नाही तर शारदामाई यांचे एक स्त्री म्हणून एक अनोखे वेगळेपण होते हे त्यांनी सांगितले. शारदामाईंकडून प्रत्येक स्त्रीने शिकावे, अशी भावना यावेळी प्रिया पै यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास सद्गुरु आणि माई यांची कन्या मालन कामत पै, नातू निखिल पै, स्वप्निल कामत, नातसून प्रिया आणि पणतू यश हे उपस्थित होते.
Similar Posts
अनधिकृत इमारत वाचवण्यासाठी ७५ लाखांची लाच घेताना पालिकेचा लाचखोर अभियंता मंदार तारीला अटक
मुंबई -मुंबई सारख्या महानगरात अनधिकृत बांधकामे कोणामुळे होतात आणि ती वाचवणारे भूमाफियांचे पालिकेतील दलाल अधिकारी कोण हे अनेक वेळा उघडकीस आले आहे. पण या चोरांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते इतके माजलेत कि आता अनधिकृत इमारती वाचवण्याच्या सुपार्या घेत आहेत. अशाच एका लाचखोर अभियंताला ७५ लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या २ साथीदारांसह…
वारी बाबत अबू आजमी च्या वादग्रस्त विधानामुळे तणाव
पुणे/ समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि संतांच्या पालख्यांबद्दल केलेल्या एका विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पत्रकारांशी बोलताना अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले.आतापर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार…
ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक नाही -राजेश टोपे
“आपल्या देशामध्येच आज ‘ओमायक्रॉन’ नावाचा कुठलाही व्हेरिएंट नाही. त्यामुळे तशी घाबरण्याचीही गरज नाही आणि ‘ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक आहे, असंही कुणी डोक्यात आणण्याची गरज नाही. कारण, तसं काही सिद्धही झालेलं नाही.” असं राजेश टोपे यांनी सांगितलं नअही. करोना महामारीचं संकट ओसरत नाही तोच आता ‘ओमायक्रॉन’ या नावाच्या नव्या व्हेरिएंटच्या संकट ओढावू पाहत आहे. सध्या संपूर्ण…
राज्य वस्तू संग्रहालयाबाबत तरुणांच्या संकल्पना मागवा ! -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची सूचना
मुंबई, : मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उभे राहणारे राज्य वस्तू संग्रहालय कसे असावे, याबाबत राज्यातील तरुणांच्या नवनवीन संकल्पना समजून घेणे आवश्यक असून त्यासाठी स्पर्धा आयोजन करावे, अशी सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज येथे केली. जागतिक वारसा व संग्रहालय दिनानिमित पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय…
शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा- गुगली काय ?
मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बड्या नेत्यांना अश्रूही रोखता आले नाहीत. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काहीवेळा…
शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन – ठाकरे गटाचा निवडणूक वचननामा जाहीर
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वचननाम्याची घोषणा केली. या वचननाम्यात शेतकरी, तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरेंनी आपल्या वचननाम्यात आपण महाराष्ट्राचे वैभव पुन्हा परत आणू, असं म्हटलं आहे. “मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातून राज्याचे हक्काचे प्रकल्प गुजरात व अन्य राज्यात पळवून नेण्याचे प्रकार भाजपाप्रणित केंद्र सरकारच्या पाठिंब्यानेच घडले आहेत. देशात इंडिया…
