गरीबांचे अश्रू पुसणे हीच शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ; खासदार गोपाळ शेट्टी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत…
