मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत ख्याती होती, अशा ओमप्रकाश मिश्र या तळागाळातील समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळे पर्यंत झटणाऱ्या नेत्याची २३ वर्षापूर्वी निर्घृण हत्या झाली. या हत्येच्या मुळापर्यंत जाऊन, तपास कार्यात भाग घेऊन प्रसंगी पोलीस पथकासोबत गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्व.ओमप्रकाश मिश्र यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून देण्यात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, असे ओमप्रकाश मिश्र यांचे निकटवर्ती व निस्सीम प्रेम करणारे भाजपाचे कार्यकर्ते इतकेच नव्हे तर ओमप्रकाश मिश्र यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा समाजसेवेचा वसा/वारसा घेऊन पुढे वाटचाल करीत असलेले प्रशांत पुजारी यांनी ओमप्रकाश मिश्र यांच्या निधनानंतर “ओमप्रकाश प्रतिष्ठान” या संस्थेमार्फत सातत्याने बोरीवली येथे समाजकार्य सुरु ठेवले आहे. गेली २३ वर्षे ओमप्रकाश मिश्र यांच्या पुण्यतिथीला रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, अपंगांना काठी, व्हील चेअर, चश्मा शिबीर, जनधन योजना अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून गरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी कार्यमग्न आहेत. आजही स्व.ओमप्रकाश मिश्र यांच्या २३ व्या पुण्यतिथीदिनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच संकल्पनेतून संपूर्ण उत्तर मुंबईत ५००० रक्त बाटल्या/पिशव्या संकलित करण्याच्या उपक्रमा अंतर्गत “महारक्तदान शिबिराचे” आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे २०० हून अधिक बाटल्या/पिशव्या रक्त जमा करण्यात आले. या उपक्रमाबद्दल व करीत असलेल्या अन्य सामाजिक कार्याबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रशांत पुजारी यांचा विशेष सन्मान केला. देशातील गोरगरीब जनतेला असाध्य रोग निवारणासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘आयुष्मान भारत’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरीवली पूर्व येथील सुमारे १८० गरीब लोकांना ‘आयुष्मान भारत’ कार्डाचेही मोफत वितरण खासदार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून त्यांना सेवा द्या, असे आवाहन गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित समस्त भाजपा व ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले व तीच ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ओमप्रकाश मिश्र यांच्या गत आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी आमदार सुनील राणे, नगरसेवक विद्यार्थी सिंह तसेच भारतीय जनता पक्ष व ओमप्रकाश प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Similar Posts
बिल्डरांच्या फायद्यासाठी एसआरएचा नवा फंडा- पोटमाळ्यावर राहणाऱ्याना घरे देण्याची योजना
मुंबई- एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजना हि बिल्डरांच्या फायद्यासाठीच असते हे आता सर्वानाच ठाऊक झाले आहे पण आता मुंबईत धारावी आणि अँटॉप हिल सारखी काही मोजकीच ठिकाणे सोडली तर फारशा झोपडपट्ट्या राहिलेल्या नाहीत त्यामुळे आता झोपड्याच शिल्लक नसल्याने पुनर्वसन कोणाचे करायचे आणि त्यातून बिल्डरांचा फायदा कसा करून द्यायचा हा प्रश्न बिल्डरांचे दलाल म्हणून काम करणाऱ्या…
तरुणाईच्या उत्साहावर पाणी नवरात्रोत्सवात गरब्याला परवानगी नाही
मुंबई/ यंदा करोनाने सणांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे गणेशोत्सव जसा साधेपणाने साजरा करण्यात आला तसाच नवरात्रोत्सव सुधा साधेपणाने साजरा करण्याचे आदेश सरकारने दिले असून गरब्याच्या आयोजनात परवानगी नाकारण्यात आल्याने तरुणाईचा उत्साह मावळला आहे काल सरकारने नवरात्रोत्सवासाठी नियमावली जरी केली त्यात देवीच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकीवर बंदी असेल तसेच मंडप सुधा मर्यादित स्वरूपाचे असतील ध्वनिक्षेपक लावण्याबाबत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपुढील काळात एक नविन चळवळ मुख्यमंत्री शिंदे च्या रूपाने महाराष्ट्रात उभी होत आहे.- भवानजी
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मी अनेक दिवसापासून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय भाग घेत आहे. भारत काही घराण्याच्या तावडीत सापडलेला दिसतो , सामान्य माणसाला राजकारणात भाग घ्यायचा असेल तर घेऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणूनच जो भारतातला टॅलेंट आहे, अत्यंत हुशार माणस आहेत, अत्यंत कर्तबगार…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईपालिकेतील आंधळे दळत आहेत आणि कुत्रे पीठ खात आहेत
बनावट कागदपत्रांच्या आधारे २८वर्ष पालिकेत नोकरी करणाऱ्या भामटयाला अटकमुंबई/भ्रष्टाचार हा आता या देशाचा स्थायी भाव बनलाय त्यामुळे ग्राम पंचायत पासून राष्ट्रपती भवणापर्यंत असे एकही ठिकाण नाही की जिथे भ्रष्टाचार होत नसेल.पण या सगळ्यात मुंबई महापालिका वरच्या क्रमांकावर आहे.जेवढं नाव मोठं तेवढा भ्रष्टाचार सुधा मोठा .मुंबई महापालिकेत आजवर पालिका अधिकारी,नगरसेवक आणि कंत्राटदारांचे घोटाळे बाहेर निघत होते…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयरस्त्यावर नमाज पडन्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला- राज ठाकरे
औरंगाबाद/मशिदींवरील भोंग्यांबबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांना 4 मे पर्यंतचा अल्टीमेंट दिला आहे.4 मे नंतर मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदिसमोर तुम्ही भोंगे लाऊन त्यावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठाण करा असे सांगितले आहे तसेच जर उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवले जाऊ शकतात मग महाराष्ट्रातल्या मशिदींवरील भोंगे का उतरवले जात नाहीत.त्याच बरोबर रस्त्यावर नमाज…
नायारचा भूखंड खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न – पालिका अधिकाऱ्यांना गोत्यात आणणार
मुंबई/ पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिल्डरला सर्वोच्च न्यायालयाने चपराक देत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे .मुंबई सेंट्रल येथील लाल चिमणी कम्पाऊड येथील नलिनी बेन यांचा ताबा असलेली गोदामांची जागा पालिकेने रबरवला डेव्हलपरला हस्तांतरीत केली होतो . ही जागा मूळची भारत स्विपिंग अण्ड विव्हींग मिलच्या मुळ मालकीची होती ….
