निवडणुकीपूर्वीच भाजपाचे ६ उमेदवार बिनविरोध
*कल्याण/भाजपने नगरपालिकेप्रमाणेच महापालिका निवडणुकीत विजयी सलामी दिली असून भाजपचे राज्यभरातून ६ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपच्या विजयाचा श्रीगणेशा झाला. कल्याण-डोंबिविलीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले असून तिन्ही उमेदवार महिला आहेत. त्यामुळे, भाजपच्या विजयाचे खाते महिलांनी खोलले. तर, कल्याण-डोंबिवलीनंतर धुळे महापालिकेत २ आणि पनवेल महापालिकेत १असे एकूण ६ उमेदवार बिनविरोध झाले…
