लालूच्या पक्षात बंडखोरी होणार ३६ आमदारांचे तिकीट कापले
पाटणा/बिहारमधील विधानसभा निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. त्यामध्ये, काही विद्यमान आमदारांचेही तिकीट कापलं जात असून नवे चेहरे मैदानात उतरवले जात आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाने यंदा तिकीट वाटपात अनेक फेरबदल केले आहेत. गत २०२० च्या निवडणुकीत जिंकलेल्या ३६ जागांवरील उमेदवार बदलून नवी…
