गणपती उत्सवातील तात्पुरत्या व्यावसायिक जाहिरातींसाठी मुंबई महापालिकेचे कडक नियम व मार्गदर्शक तत्त्वे जारी
मुंबई:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक उत्सव मंडपे, कमानी व परिसरात लावायच्या तात्पुरत्या व्यावसायिक जाहिरातींसाठी सुधारित नियम व मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. उत्सवाचा उत्साह जपतानाच शहरातील वाहतूक सुरक्षा, स्वच्छता आणि नागरिकांची सोय अबाधित राखणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.महापालिकेच्या निर्देशानुसार, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जाहिराती, कमानी आणि डिजिटल फलक उभारण्यापूर्वी पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाची…
