महर्षी दयानंद कॉलेज कला. १९८७/८९ तर्फे कोकण वासियांना मदतीचा हात
मुंबई-(किसन जाधव) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये कोकणातील नद्यांना पूर येवून अनेक गावे पाण्याखाली गेली तसेच काही ठिकाणी भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि वितहानी झाली त्यामुळे कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाखो लोक विस्थापित झाले आहे. सरकारने त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असले तरी आज या विस्थापितांना अंगावरच्या कपड्या खेरीज काहीच राहिलेले नाही…
