मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची येवढी हिम्मत होतेच कशी ? असा सवाल करीत तो फेरीवाला ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल त्याची सर्व बोटे छाटली जातील . त्यामुळे तो फेरीवाला म्हणून फिरूच शकणार नाही असा इशारच राज ठाकरे यांनी दिला आहे . काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला .दरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला करताना यात्रा मेळावे बिनबोभाट होतात .मग सन ‘ उत्सवांच्या वेळेसच कोरोंना कसं पसरतो ? असा सवाल करून आता सर्व सुरू झालेल आहे . त्यामुळे मंदिरे खूले करावीत अन्यथा मनसे यापुढे घंटानाद आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिलाय .त्याच बरोबर इतके दिवस शांत बसलेले अन्न हजारे आताच कसे प्रकट झाले असा सवालही त्यांनी केला
Similar Posts
केंद्राकडून महाराष्ट्राला १ लाख कोटींचे कर्ज
दिल्ली -केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १ लाख कोटींचे कर्ज मिळणार आहे. या कर्जामुळे महाराष्ट्रातील काही समस्या सुटली तसेच काही प्रकल्प मार्गी लागतील त्यामुळे फडणवीसांनी केंद्राचे आभार मानलेत50 वर्षांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 1 लाख कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबद्दल फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याशिवाय…
आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात राडा__ ५० हून अधिक दंगलखोरांना अटक
नागपूर/औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात जबरदस्त राडा झाला तोडफोड आणि जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लाठीमार केला यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकी मध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेऊन सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सक्त कारवाईचे आदेश दिले आहेतऔरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर…
पवार काका -पुतण्याची भेट चर्चाना उधाण
मुंबई – अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील वडिलधारा माणूस मी आहे, त्यामुळे मला कुणी भेटायला आलं किंवा मी कुणाला भेटायला बोलावलं, हा चर्चेचा विषय बनू शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं…
दहीहंडी म्हणजे स्वातंत्र्य युद्ध नाही -मुख्यमंत्री
मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला…
भायखळ्यातील नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण
दक्षिण मुंबईतील भायखळा पूर्व रेल्वे स्थानकापासून जवळ असणाऱ्या नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण आज शुक्रवार दि. ३१ जुलै पार पडले. या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री (मुंबई शहर जिल्हा) एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती सचिन अहिर; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सह पालकमंत्री मंगल…
