मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला सुनावले आहे . ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठाणच्या वतीने ऑक्सीजन प्लांटचे लोकपर्ण ऑन लाइन पद्धतीने करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते .यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ,संजय राऊत रवींद्र फाटक ,महापौर नरेश म्हसके आणि संस्कृती प्रतिष्ठानचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते . मुख्यमंत्री ठाकरे यांनी दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना खडे बोल सुनावत संगितले की गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे उत्सव साजरे करताना काळजी घ्या गर्दी व्हायला देऊ नका असे आम्हाला केंद्रानेच पत्र पाठवले आहे .त्याचे आम्ही पालन करतोय .शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाला सुरूवातीपासून बांधील आहे .म्हणूनच आम्ही समाज कारणाला अधिक महत्व देतो .टास्क फोर्स आणि इतर तज्ञ तिसर्या लाटेचा धोका आहे असे सांगत असताना जे लोक यात्रा करून गर्दी जमवत आहेत .त्यांना फक्त राजकारण कारचे आहे असेही ते म्हणाले .
Similar Posts
८२८८ घरांसासाठी म्हाडाची लॉटरी
मुंबई/ घर घेण्यास इच्छुक असल्यासाठी एक खूश खबर आहे कारण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८२८८ घरांसाठी १४ ऑक्टोबरला लॉटरी उघडली जाणार असून २३ऑगस्ट पासून फॉर्म ची विक्री सुरू होणार आहे .फॉर्म सोबत ५ हजार रुपये जमा करावे लागतील .तसेच पुढील ८ दिवसात मुंबईतील घरांच्या लॉटरीची ही म्हाडा घोषणा करणार आहे. कोकण विभागासाठी या लॉटरीत ठाणे,मिरा रोड,वर्तक…
पालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांना कोरोणच्या तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने आर्थिक पर्वणी मलिद्यासाठीच नव्या जंबो कोविड सेंटरचा खटाटोप
मुंबई/ पंतप्रधान मोदी कधीतरी म्हणाले होते की माणसाला पुढे जायचे असेल तर संकटात सुधा संधी शोधायला हव्यात.आज सेना भाजपचे भलेही भांडण सुरू असेल तरी पंतप्रधान मोदींचा अमूल्य सल्ला पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने शिरसावंद्य मानून कोरॉनाच्या संकटकाळात सुधा कुठे कुठे कसा कसा हात मारता येईल याकडेच अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे.आणि त्याचेच जिवंत उदाहरण महालक्ष्मी रेस्कोर्स…
रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढणार
मुंबई/ पेट्रोल पाठोपाठ सी एन जी सुधा महागल्याने येत्या 1 ऑक्टोबर पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतला आहे . त्यानुसार टॅक्सीचे भाडे 25 वरून28 रुपये तर रिक्षाचे 21 वरून 23 रुपये भाडे होणार आहे .रात्रीच्या प्रवास भधे टॅक्सीचे 32 वरून 36 तर रिक्षाचे 27 वरून 31 रुपये होणार आहे ….
मूळ पगारात साडेसहा हजारांची वेतनवाढ-मुख्यमंत्रयांबरोबरच्या चर्चे नंतर एसटी कामगारांचा संप मागे
मुंबई – राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर आज सह्याद्रीय अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चर्चे अंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त…
ए एफ एम सी यांच्या वतीने डॉ.कीर्ती पवार यांचा गौरव
मुंबई/ देशाचे संरक्षण करणाऱ्या आर्मी मध्ये डॉक्टर म्हणून काम करताना तर एक वेगळीच अनुभूती मिळत असते, पण जेंव्हा या कार्याचा गौरव केला जातो त्यावेळचा आनंद काही वेगळाच आणि रोमांचकारी असतो. डॉ.कीर्ती पवार यांनाही असाच अनुभव मिळाला१७ वर्षांपूर्वी म्हणजे २००३ मध्ये बारामती वरून बसने पुण्याला शिक्षणासाठी जाऊन हडपसर येथील ए एफ एम सी जवळ उतरून आपल्या…
शाळा १५ डिसेंबर पासून सुरू होणार
मुंबई/ ओंमीक्रोम ची दहशत तब्बल १९ देशांमध्ये पसरली असून भारतातही खबरदारीचे उपाय केले जात आहे .ओमी क्रोन मुले मोठा हाहाकार उडू शकतो असा इशारा who या जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही महापालिकानी शाळा सुरू करण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयात बदल केला आहे मुंबई महा पालिकेने १ डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय…
