वरळीत १६९ अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
मुंबई/किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत आणि वरळी येथील खान अब्दुल खान गफार मार्ग स्थित असलेल्या मद्रासवाडीतील एकूण १६९ अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने हातोडा चालविला. महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयाने निष्कासनाची कारवाई केली.अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात…
