मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी केंद्र सरकारचा तीन टप्प्यांचा कृती आराखडा
खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर नवी दिल्ली :युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या देशातील १२ ऐतिहासिक मराठा किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने तीन टप्प्यांचा सर्वसमावेशक ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन’ तयार केल्याची माहिती केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली आहे. राज्यसभा सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव…
