मीच नव्हे संपूर्ण देश तुमच्यावर हसतोय! पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत सुरु असलेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेसला केवळ विरोधाचा बहाणा हवा आहे. आमच्या सैन्याने पाकिस्तानला जन्माचा धडा शिकवला आहे. एकीकडे साऱ्या जगाने भारताची ताकद पाहिली आणि काँग्रेस त्यातही खुचपटं काढत भारतीय सैन्यांचे मनोबल कमी करीत पाकिस्तानची भाषा बोलत आहेत अशीही टीका पंतप्रधानांनी केली…
