[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भारताचा अमेरिका व पाकिस्तानला मोठा झटका


नवी दिल्ली/अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दूतावास सुरु करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी यांच्यासोबतच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही घोषणा केली. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या अखंडतेच समर्थन केलं. २०२१नंतर पहिल्यांदाच भारताने अफगाणिस्तानच्या संप्रभुतेला पूर्ण समर्थन दिलय.
मुताकीसोबतच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, “भारताने नेहमीच अफगाणिस्तानची साथ दिली आहे. अफगाणी आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अफगाणिस्तानने अलीकडेच दहशतवादाविरुद्ध लढाईत आम्हाला साथ दिलेली. पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला”अफगाणिस्तानात सध्या रशिया आणि पाकिस्तान या देशांचे दूतावास आहेत. काबूलमध्ये भारताचा उच्चायोग आहे. पण तो दूतावास नाहीय. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर भारत सायलेंट मोडमध्ये होता. पण आता भारताने अफगाणिस्तानात दूतावास खोलण्याची घोषणा केली आहे. जयशंकर पुढे म्हणाले की, “अफगाणिस्तानात विकास आणि मानवी सहाय्यतेच भारताचं काम सुरु राहिलं. त्याशिवाय अफगाणिस्तानात ज्या प्रोजेक्ट्सची भारताने घोषणा केलेली, ते आम्ही पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत आहोत” भारताने अफगाणिस्तानला २० रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली आहे.
जयशंकर यांच्यासोबतच्या बैठकीत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुताकी म्हणाले की, “भारत नेहमीच अफगाणी जनतेसोबत उभा राहिलाय. आम्ही भारताविरुद्ध कुठलही कट, कारस्थान रचू देणार नाही” दोन्ही देशांमध्ये क्रॉस बॉर्डर टेररिज्म बद्दलही चर्चा झाली. मुताकी तालिबान शासनातील पहिले परराष्ट्र मंत्री आहेत, जे भारत दौऱ्यावर आलेत. नवी दिल्लीला येण्याआधी मुताकी यांनी तालिबानी लीडर अखुंजदा यांची भेट घेतली अफगाणिस्तानात दूतावास सुरु करण्याचा भारताचा निर्णय म्हणजे सध्याच्या परिस्थितीत मास्टर स्ट्रोक आहे. तालिबान सरकारला अजून जगातल्या अनेक देशांनी मान्यता दिलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तालिबानला बगराम एअर बेसवरुन वाईट परिणाम भोगण्याच्या धमक्या देत आहेत. भारत आणि तालिबानचे संबंध सुधारावेत अशी पाकिस्तानची सुद्धा इच्छा नाहीय. पण भारताने आता थेट तालिबान राजवटीत दूतावास सुरु करण्याचा निर्णय घेऊन दोन्ही देशांना मोठा धक्का दिला आहे.

error: Content is protected !!