जन गण मन”च्या अगोदर वंदे मातरम् बंधनकारककेंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/देशभरात प्रत्येक सरकार कार्यक्रमात आता जन-गण-मन या राष्ट्रगीतापूर्वी, वंदे मातरम गायन बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या संपूर्ण सहा कडव्यांचं गायन किंवा वादन अनिवार्य करण्यात आलं आहे. याबद्दल गृह मंत्रालयानं 10 पानांचा सविस्तर आदेश जाहीर करून हे सर्व नियम स्पष्ट केले आहेत….
