मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यशस्वी अयोध्या दौरा- रामल्लाचे दर्शन घेऊन केली शरयू नदीची आरती
अयोध्या –मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केले. आज दिवसभरात निर्माणाधीन अयोध्येतील राम मंदिराची पाहणी केल्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भूसे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. आरतीसाठी शरयू नदीच्या तीर फुलांनी सजवण्यात आला होता….
