मुंबई : लोअर परळ-वरळीतील फिनिक्स पॅलेडियम मॉलमध्ये मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिल्याचा प्रकार समोर आला. मराठी भाषा दिनाच्या काही दिवसांतच पुस्तक प्रदर्शनात मराठी पुस्तकांचा एकही ठेवा नसल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे.महिला दिनानिमित्त १५ मार्चपर्यंत चालू असलेल्या या भव्य प्रदर्शनात ‘लॉक द बॉक्स’ योजना राबवली जाते. १,१९९ रुपयांचा हिरवा, १,९९९ चा भगवा आणि २,९९९ चा गुलाबी बॉक्स – यात आवडीनुसार पुस्तके भरून लॉक करा आणि पैसे भरा. ‘बुकचोर’ कंपनीने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात शेकडो पुस्तके आहेत – बहुतेक इंग्रजीची; हिंदी, फ्रेंच, जर्मनसुद्धा. पण मराठी पुस्तकांचा शोध घेतल्यास हा शून्य!मराठीबहुल भागात असलेल्या या मॉलमध्ये मराठी पुस्तकांना स्थान नाकारले, तसेच जुनी मराठी पुस्तके विकण्यासही नकार. आयोजकांकडून स्पष्टीकरण नाही. हा प्रकार वरळी विधानसभा मतदारसंघात (आदित्य ठाकरे) घडला असून, स्थानिक नगरसेवकही शिवसेनेशी जोडलेले आहेत.मराठी-संस्कृतीचे रक्षक म्हणवणाऱ्या नेत्यांपासून मॉल प्रशासनापर्यंत – हा जाब विचारणार का?

