वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे विशेष व्याख्यान संपन्न
मुंबई:येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी सनदी अधिकारी व ‘चाणक्य मंडल परिवार’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. “युवा पिढी, राष्ट्रनिर्माण आणि करिअरच्या संधी” या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात धर्माधिकारी म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या या युगात तरुण अभियंत्यांवर केवळ स्वतःचे करिअर घडवण्याचीच नव्हे, तर देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान…
