नॅशनल पार्कमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची दारू पार्टी! चौकशीचे आदेश
बोरिवली: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही वनअधिकाऱ्यांनी मद्यपान केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संरक्षण चौकीसारख्या ठिकाणी वनअधिकारी मद्यपान करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला…
