बेस्टची अखेर भाडेवाढ जारी
मुंबई – बेस्टचे भाडे एक रुपयापासून १२ रुपयांपर्यंत वाढवण्यास बेस्ट समितीने मंगळवारी मंजुरी दिली. पालिकेच्या सभागृहात मंजुरी मिळण्याची औपचारिकता पार पडल्यानंतर ही भाडेवाढ लागू होईल.बेस्ट परिवहन उपक्रम डबघाईला आल्यामुळे त्याला आर्थिक मदत मिळावी, यासाठी महापौरांच्या मध्यस्थीने पालिका आयुक्तांशी तीन विशेष बैठका झाल्या. आयुक्तांनी बेस्टला थेट आर्थिक मदत देण्यास नकार दिला; परंतु बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी…
