हिंदीच्या सक्ती बाबत मनसेचा सरकारला इशारा
मुंबई/शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीला मनसेने विरोध केला आहे. उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्यासाठी आयएएस लॉबी कडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जात आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे .तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशाराही त्यांनी दिला आहे….
