मुंबई/ आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेत आतापर्यंत अधिकाऱ्यांचे आर्थिक घोटाळे उघडकिस येत होते पण आता चोऱ्याही उघडकीस यायला लागल्या आहेत. पालिकेच्या मुखायलायाच्या कॅन्टीन मधून वेगवेगळ्या विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी जेवण किंवा नाश्ता मगवतात पण ज्या भांड्या मधून हे पदार्थ पोचवले जातात ती भांडी काही कर्मचारी कॅन्टीन मध्ये परत न पाठवता चक्क घरी घेऊन जातात यात स्टीलच्या चमचे वाट्या प्लेट आणि ट्रेचां सुधा समावेश आहे त्यामुळे कॅन्टीन चालवणारा कंत्राटदार हैराण झाला आहे. त्याने याबाबत कॅन्टीचां बाहेर चक्क बोर्ड लावला आहे.श्रीमंत महापालिकेच्या कॅन्टीन मधूनभांडी चोरीचा हा प्रकार मुंबई महापालिकेची अब्रू घालणारा असून या प्रकरणाची चौकशी करून पालिकेतील अशा चिंधी चोर लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे.
Similar Posts
आठवड्यातून ३ दिवस मंत्रालयात थांबा – मुख्यमंत्र्यांचे सर्व खात्याच्या मंत्र्यांना आदेश
मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारचा कारभार लोकाभिमुख व्हावा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्यानुसार आठवड्यातून किमान ३ दिवस तरी मंत्र्यांनी मंत्रालयात थांबावे असे आदेश सर्व मंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांना मुंबईत थांबणे आणि मंत्रालयात येणाऱ्या लोकांची कामे करणे बंधनकारक असेलराज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील घराणे शाही – गिरीश महाजनांच्या पत्नी तर मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध
जळगाव /काँग्रेसच्या घराणेशाही बद्दल ओरडणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या घराणेशाहीचा झेंडा फडकवला.जामनेर नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध निवडून आल्या तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊही नगराध्यक्षपदी विराजमान झाले.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यंदा बिनविरोध पॅटर्न राबवल्याचं पाहायला मिळत आहे. ऑपरेशन लोटसमध्ये भाजपने निवडणुकांच्या अगोदरच अनेक माजी आमदार…
कौतुकाचे पूल बांधत दिला स्नेहीजनांनी निरोप – डॉ उज्ज्वला जाधव मुंबई विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून झाल्या निवृत्त !
मुंबई विद्यापीठात डॉ. उज्ज्वला जाधव, जीवविज्ञान विभागाच्या प्रमुख, यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ अत्यंत हर्षोल्लासाच्या वातावरणात संपन्न झाला. डॉ उज्वला जाधव यांच्या स्नेहीजनांनी सत्कार समारंभात त्यांच्या कौतुकाचे जबरदस्त पूल बांधत गुणवर्णनांची बरसात केली. विद्यापीठातील बहुसंख्य विभागाचे विभाग प्रमुख, अधिष्ठाता, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरच अनेक संस्था आणि सामाजिक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच फुलांची उधळण…
५० लाखांचे इनाम असलेला कुख्यात मावो वादी मिलिंद तेलतुंबडेचा खेळ खल्लास
गडचिरोलीत २६ माओ वाद्यांचे एन्काऊंटरगडचिरोली/ सरकार आणि सुरक्षा दलांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या २६ माओ वाद्यांना गडचिरोलीच्या जंगलात कंठ स्नान घालण्यात अखेर सुरक्षा दलांना यश आले असून शनिवारी झालेल्या चकमकीत २६ माओ वादी ठार झाले ज्यात माओ वाद्यांचा कमांडर आणि ज्याच्यावर ५० लाखांचे इनाम होते अशा मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. तसेच मृतांमध्ये ६ महिला माओ…
कर्जमाफीची तारीख जाहीर करा तरच माघार!शेतकरी आंदोलक आक्रमक
नागपूर/बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि इतर शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांकडून नागपूरमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं की आम्ही शांत बसलो की सरकार शांत होतंय. आम्ही जेलभरो करायला लागलो की तुम्ही लगेच…
विरारमध्ये इमारत कोसळून 15 जणांचा मृत्यू
विरार /विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला. इमारतीचा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाली असून, अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची शक्यता आहे.कोसळलेल्या इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये एकूण ५० सदनिका…
