मुंबई- पुढील वर्षी होणार्या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या घोषनेची भाजपने चांगलीच खिल्ली उढवली आहे . भाजपने म्हटले आहे की मागील वर्षी सुधा शिवसेनेने असाच पोरकटपणा केला होता पण झाले काय तर सगळ्या उमेदवारांची अनामत जप्त झाली .त्यामुळे यावेळीही शिवसेनेने युपी आणि गोव्यात निवडणुका लढवल्यातरी पुन्हा त्यांच्या उमेदवारांची अनामत जप्त होईल . युपी मध्ये शिवसेना नवालाही नसल्याने आणि तिथे त्यांनी कोणतेही काम केलेले नसल्याने त्यांना तिथले लोक कसे स्वीकारतील त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे
Similar Posts
मतदानाला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला, तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. ९ डिसेंबर १९४६ पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या १४१ दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. ३ नोव्हेंबर १९४७ पण हा काही अंतिम मसुदा नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण १२ सत्रं…
ध्वनी प्रदूषण याची तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई/विविध धार्मिक उत्सव तसेच रस्त्यावरील मंडप आणि मशिदींवरील भोंगे यांच्यातून होत असलेले ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन उद्या मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती २०१६ मध्ये या जनहित याची केवळ सुनावणी होऊन सरकारने यावर कठोर उपाययोजना कराव्यात असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. परंतु या आदेशाची अंमलबजावली करण्यात…
मुंबईत झाले नालेसफाईचे दोन बळी
मुंबई/आज मुंबईच्या गोवंडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. सफाई करीत असताना नाल्यात पडून दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला.गोवंडीच्या शिवाजीनगर भागात एका नाल्याची सफाई करीत असताना रामकृष्ण आणि सुधीर दास हे दोन कंत्राटी कामगार नाल्यात पडले दरम्यान काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे नाल्यात पाणी होते त्यामुळे या पाण्यात दोन्ही कामगार गुदमरले. या घटनेची माहिती अग्निशमन…
श्रीमंतांची दिवाळी- दुःख गरिबांच्या भाळी
दोन वर्षात कोरोनाच्या संकट काळात लोकांना कोणताही सन साजरा करण्यात आला नव्हता पण यावर्षी मात्र करोना गेल्याने दोन वर्षांनी का होईना लोकांना सर्व सण साजरे करायची संधी मिळालेली आहे. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आता दिवाळी लोक मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत.पण सगळ्यांच्याच नशिबी दिवाळीचा आनंद नाही ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाशी आलेली पिके…
महाराष्ट्र पोलीस दलाला 43 राष्ट्रपती पदकं जाहीर – IG सुनिल फुलारींसह 4 अधिकारी ठरले विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी…
प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण (एचजी अँड सीडी) आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 942 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.यापैकी पोलीस सेवेत महाराष्ट्रातील एकूण 43 पोलीस या पदकांचे मानकरी ठरले असून त्यात चौघांना विशिष्ट सेवा पदकं (PSM) तर 39 जणांना गुणवत्तापूर्ण सेवा पदकं (MSM) घोषित झाली आहेत….
भाईंदर मध्ये मराठी माणसांना फ्लॅट देण्यास नकार
भाईंदर/महाराष्ट्रात मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही. मुंबईच्या उपनगरात असेलल्या भाईंदर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. भाईंदर मध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे. विशिष्ट जाती धर्माची नावे घेत तसेच जात समजल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबधीत व्यक्तीने केला आहे.भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आलाय. रवींद्र खरात भाईंदर…
