भारतीय लष्करातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या आय एस आय च्या गुप्तहेरला अटक
जयपूर/पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध इतके जास्त ताणले गेले की, परिस्थिती युद्धाची निर्माण झाली. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होती. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला भारतावर केला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचे जीव गेले. प्रचंड संताप पहलगाम हल्ल्यानंतर भारतात बघायला मिळाला. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने त्यांच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने दहशतवादी अड्डे उध्दवस्थ केली. या युद्धात पाकिस्तानचे अनेक विमान भारताने पाडली. परिस्थिती अत्यंत तणावाची होती आणि लष्कराकडून सडेतोड उत्तर पाकिस्तानच्या हल्ल्याला दिले जात होते. मात्र, यावेळी लष्कराची काही गुप्त माहिती पाकिस्तानमध्ये पोहोचवली जात होती.
राजस्थान इंटेलिजेंसने आता मोठी कारवाई करत अलवर येथील रहिवासी मंगत सिंग याला अटक केलीये. ऑपरेशन सिंदूरदरम्यान तो धक्कादायक माहिती पाकिस्तानात पाठवत असल्याचे स्पष्ट झाले. मंगत सिंग हा पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करत होता. त्याला अधिकृत गुपिते कायदा १९२३ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याने ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानमध्ये पाठवली
मंगत सिंग हा तब्बल गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानातील दोन नंबरसोबत सतत संपर्कात होता. त्याने अलवर आर्मी कॅन्टोनमेंटसह सैन्याबद्दल महत्त्वाची माहिती पाकिस्तानात पाठवली. तो ही माहिती मोठा पैसा घेऊन पाठवत असत. पाकिस्तानातून त्याच्या नावावर मोठी रक्कम आल्याचे स्पष्ट झालंय. ऑपरेशन सिंदूरनंतर राजस्थान गुप्तचर यंत्रणेने मंगत सिंगच्या हालचालीवर लक्ष ठेवले. अलवर कॅन्टोन्मेंट परिसरात पाळत ठेवताना मंगत सिंग बऱ्याचदा आढळून आला. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात तो होता.
