पुणे- कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सत्ताधारी आणि विरोधकांना एका एका जागांवर विजय मिळला आहे. कसबा काँग्रेसकडे गेले तर चिंचवडमध्ये भाजपने गड राखला. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला नसता तर कदाचीत भाजपला दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असता. पण कलाटेंनी भाजपच्या विजयाच्या मार्गात येणारे काटे दूर केले. त्यामुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला. जर कसब्याप्रमाणे दुरंगी लढत झाली असती, तर कदाचीत भाजपला दोन्ही जागांवर पराभव पाहावा लागला असता.
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी विजय मिळवला. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अश्विनी जगताप यांच्याबद्दल सहानभुतीची लाट होती. पण महाविकास आघाडीने कंबर कसली होती. अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, नाना पटोले यासारखे नेते चिंचवडमध्ये उतरले होते. पण महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला. अश्विनी जगताप यांनी३६ हजार १६८ मिळवला
तिरंगी लढत झाल्याचा भाजपला फायदा झाला.. राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. त्यांची महाविकास आघाडीकडून समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण कलाटे निवडणूक लढण्यावर ठाम होते. त्यातच त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षाने पाठिंबा दिला… त्यामुळे राहुल कलाटे यांचा आत्मविश्वास अधिक वाढला.. पण प्रत्यक्षात त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला.. भाजपच्या अश्विनी जगताप यांना १ लाख ३५हजार ६०३ मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली. बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार 112 मते मिळाली. अश्विनी जगताप या ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने विजयी झाल्या.
कसब्यात भाजपच्या गडाला काँग्रेसने खिंडार पाडले. भाजपने जवळपास २८ वर्ष कसब्यात राज्य केले होते. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा 10 हजार ९५० मतांनी पराभव केला. भाजपसाठी कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचारासाठी हजेरी लावली होती. पण रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या गडाला खिंडार पाडले. धंगेकर यांना ७३१९४ मते मिळाली तर भाजपच्या रासने यांना ६२२४४ मते मिळाली. कसब्यातील लढत दुरंगी झाली होती, इतर एकही नेता तितका ताकदीचा नव्हता. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये यांच्यात लढत थेट झाली.
