पुणे / सध्या हरहर महादेव या चित्रपटावर बंदी येण्याची शक्यता आहे या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असल्याचा आरोप करून काल संभाजी ब्रिगेडने पिंपरीच्या विशाल सिनेमा गृहात घुसून या चित्रपटाचा शो बंद पाडला .
संभाजी राजे आणि संभाजी ब्रिगेड यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीने सुधा या चित्रपटाला विरोध केला आहे .संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन सिनेमॅटिक लिबरटीच्या नावाखाली शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे .त्यामुळे महाराजांच्या वंशातील एक वारसदार म्हणून मी हरहर महादेव सिनेमाला विरोध करतोय यापुढे असेल प्रकार झाले तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा त्यांनी निर्मात्याला दिला आहे.त्यामुळे आता या छत्रपती निर्माण झालेला वाद आणखी वाढणार आहे .
